IMPIMP

Pune Crime News | पुण्यात भरदिवसा व्यापार्‍याकडील रोकड लुटणार्‍या 2 मुख्य आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट-1 कडून अटक

by nagesh
 Pune Crime News | Pune Police Crime Branch Unit-1 arrested 2 main accused who robbed cash from traders in broad daylight in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime News | पुण्यातील रास्ता पेठेत (Rasta Peth Pune) भरदिवसा व्यापार्‍यास कोयत्याचा धाक दाखवुन त्यांच्याकडील 47 लाख रूपये लुटणार्‍या 2 मुख्य आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट- 1 ने अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 लाख रूपये जप्त करण्यात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे (Pune Police Crime Branch) अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende) आणि सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) यांनी दिली आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

किरण अशोक पवार Kiran Ashok Pawar (रा. अप्पर, बिबवेवाड) आणि आकाश कपील गोरड Akash Kapil Gorad (रा. अप्पर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. भरदिवसा व्यापार्‍यास लुटणार्‍यांचा युध्दपातळीवर शोध घेवून त्यांना अटक करण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिले होते. गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त सुनिल पवार आणि युनिट-1 चे पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद हे समर्थ पोलिस ठाण्यात (Samarth Police Station) दाखल असलेल्या गुन्हयाचा समांतर तपास करीत होते. त्यांनी पुणे शहरातील बाणेर, हिंजवडी, गहुंजे आणि परिसरातील 200 ते 250 सीसीटीव्ही फुटेज तपासले. दरम्यान दि. 28 मार्च रोजी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राहुल मखरे आणि पोलिस अंमलदार दत्ता सोनवणे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत सदरील गुन्हा हा किरण पवार आणि त्याचा साथीदार आकाश गोरड यांनी केल्याची माहिती मिळाली. सध्या किरण पवार हा वाघोली परिसरात लपुन बसला असल्याचे समजले तर आकाश गोरड हा पवना डॅम कोथरणेगाव येथे पळून गेला असून त्याच्याकडे लुटलेली रक्कम असल्याची माहिती मिळाली. (Pune Crime News)

 

गुन्हे शाखेच्या युनिट-1 च्या पथकाने दोघांबाबत अधिक माहिती घेतली.
त्यानंतर आकाश गोरड याला पवणा डॅम कोथुरणे गाव परिसरातून ताब्यात घेतले.
त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली.
त्याच्याकडून 1 लाख रूपये जप्त करण्यात आले तर पोलिस पथकाने किरण पवारला वाघोली येथील वाघेश्वर
मंदिर परिसरातून ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून 4 लाख रूपये जप्त केले.
पोलिसांनी दोघांकडून एकुण 5 लाख रूपये जप्त केले आणि त्यांचा अटक केली.
दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरूध्द भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन आणि
बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे आणि बेकायदेशीररित्या हत्यार बागळण्याचे गुन्हे दाखल आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar), सह आयुक्त संदिप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik),
अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे आणि सहाय्यक आयुक्त सुनिल पवार यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद (PI Shabbir Sayyad), पोलिस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी,

पोलिस अंमलदार दत्ता सोनवणे, शुभम देसाई, राहुल मखरे, अभिनव लडकत, निलेश साबळे, महेश बामगुडे, आय्याज दड्डीकर, विठ्ठल साळुंखे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

 

Web Title :-  Pune Crime News | Pune Police Crime Branch Unit-1 arrested 2 main accused who robbed cash from traders in broad daylight in Pune

 

हे देखील वाचा :

Dr Neelam Gorhe On Girish Bapat | गिरिष बापटांसारखा नेता, असा खासदार पुनः होणे नाही – डॉ. नीलम गोऱ्हे

CM Eknath Shinde On Girish Bapat | खासदार गिरीश बापट यांच्या जाण्याने समाजाचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | पहिली ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा; कल्याण इलेव्हन संघाचा सलग दुसरा विजय; ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबची विजयी सलामी !!

 

Related Posts