IMPIMP

Pune Crime News | लोणीकंद परिसरातील मनोरा हॉटेलमधील ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश; बांगलादेशी तरुणीसह 6 जणींची सुटका, दोघा मॅनेजरांना अटक

by sachinsitapure
Ayurvedic Massage Center Sex Racket

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  Pune Crime News | तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय (Prostitute Business) करुन घेणार्‍या लोणीकंदमधील हॉटेल मनोरा (Hotel Manora Lonikand) येथे सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) छापा टाकला. तेथून सहा तरुणींची सुटका केली असून तेथील दोघा मॅनेजरांना अटक केली आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

प्रज्योत हिरीआण्णा हेगडे Prajyot Hirianna Hegde (वय २७, रा. पेरणे फाटा) आणि गिरीश शाम शेट्टी Girish Sham Shetty (वय २९, रा. पेरणे फाटा) अशी अटक केलेल्या मॅनेजरांची नावे आहेत. हा प्रकार लोणीकंदमधील हॉटेल मनोरा येथे सुरु होता. येथून २० वर्षाच्या बांगला देशीय तरुणीसह हिंजवडी, कोलकत्ता येथील ६ तरुणींकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता.

याबाबत सामाजिक सुरक्षा विभागातील रेश्मा कंक यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७२२/२३) दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मनोरा येथे वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती फ्रिडम फर्मच्या (Freedom Firm) सदस्यांना मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाने तेथे बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर तेथे छापा टाकला. त्यात हॉटेलमध्ये ६ तरुणीकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे आढळून आले. मॅनेजर ग्राहकाकडून दीड हजार रुपये घेत असत. त्यातील एक हजार रुपये दोघे वाटून घेऊन तरुणींना पाचशे रुपये देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांना दोघा मॅनेजरांना अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव
(Sr PI Bharat Jadhav), सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे (API Aniket Pote), एपीआय राजेश माळेगावे
(API Rajesh Malegave), पोलिस हवालदार अजय राणे, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, पोलिस अंमलदार सागर केकाण,
तुषार भिवरकर, अमेय रसाळ, अमित जमदाडे, संदीप कोळगे, किशार भुजबळ, ओंकार कुंभार,
इरफान पठाण आणि महिला पोलिस रेश्मा कंक यांच्या पथकाने केली आहे.

Related Posts