IMPIMP

Pune Crime News | पुण्यात अजब प्रकार ! दशक्रिया विधीला लागणारे साहित्य चोरट्यांनी केले लंपास; शनिवार पेठेतील ओंकारेश्वर घाटावरील घटना

by nagesh
Pune Crime News | Strange type in Pune! Thieves looted materials required for Dasakriya ritual

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | छोट्या मोठ्या चोर्‍या करुन त्याची विक्री करुन त्यातून आलेल्या पैशांमधून व्यसने करणार्‍या अनेक भुरटे चोर शहरात वावरत असतात. त्यांना आता दशक्रिया विधीसाठी लागणारे साहित्यही कमी पडू लागले आहे. ओंकारेश्वर घाट (Omkareshwar Ghat Pune) येथील कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दशक्रिया विधीसाठी वापरले जाणारे साहित्य चोरुन नेले. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत पौराहित्य अथर्व प्रशांत मोघे (वय २०, रा. सिंहगड रोड) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १५०/२३) दिली आहे. हा प्रकार शनिवार पेठेतील दशक्रिया विधी घाटावरील महापालिकेच्या इमारतीत ७ जुलै रोजी सायंकाळी ४ ते ८ जुलै सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दशक्रिया विधीचे पौराहित्य करतात.
दशक्रिया घाट इमारतीमधील कपाटात त्यासाठी लागणारे साहित्य ठेवलेले असते.
चोरट्याने इमारतीचे शटर उचकटून आत प्रवेश केला.
कपाटाचे कुलूप तोडून त्यातील १० मोठी ताम्हणे, १९ पळ्या, १० छोटी ताम्हणे, २ तांबे असा ६ हजार ६०० रुपयांची भांडी चोरुन नेली. पोलीस नाईक भोसले तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Strange type in Pune! Thieves looted materials required for Dasakriya ritual

Related Posts