IMPIMP

Pune Crime News | प्रवाशाच्या कानाचा लचका तोडणाऱ्या रिक्षा चालकाला स्वारगेट पोलिसांनी ठोकल्या बेड्या, रिक्षाच्या भाड्यावरुन झाला होता वाद

by nagesh
Pune Crime News Swargate police arrested a rickshaw driver who broke a passenger’s earlobe

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुण्यात भाड्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून रिक्षा चालकाने (Rickshaw Fare) प्रवाशाच्या कानाचा लचका तोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या घटनेनंतर रिक्षा चालक तिथून पळून गेला होता. पळून गेलेल्या रिक्षा चालकाचा स्वारगेट पोलीसांनी (Pune Police) शोध घेऊन त्याला अटक (Arrest) केली आहे. ही घटना (Pune Crime News) 1 जून रोजी पहाटे एकच्या सुमारास स्वारगेट एसटी स्टँड (Swargate Bus Stand) येथे घडली होती. आदेश संजय काळे (वय-39 रा. पर्वती दर्शन पुणे) असे अटक केलेल्या रिक्षा चालकाचे (Rickshaw Driver) नाव आहे.

रिक्षा भाड्याच्या कारणातून झालेल्या वादात एका प्रवाशाला रिक्षाचालकाने लाथाबुक्यांनी मारहाण केल्यानंतर दाताने चावा घेऊन त्यांच्या कानाचा लचकाच तोडला. याप्रकरणी, रिक्षाचालकाच्या विरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) आयपीसी 307, 325, 34, क्रिमिनल लॉ अॅमेंडमेट नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मुळगावी अलिबाग येथे जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानक परिसरात आले होते. त्यावेळी एका रिक्षाचलाकासोबत त्यांचा भाड्याच्या कारणातून वाद झाला. त्यावेळी तेथील काही रिक्षाचालकांनी त्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यादरम्यान वाद झालेल्या रिक्षाचालकाने त्यांच्यावर कोयत्याने वार केला पण फिर्य़ादी यांनी वार हुकविला व ते दोघेही खाली पडले. त्यावेळी रिक्षा चालकाने फिर्यादी त्यांच्या कानाच्या वरच्या भागाचा चावा घेऊन लचका तोडला. त्यानंतर आरोपी पळून गेला.

 

आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अनिस शेख (Anis Shaikh) व शिवा गायकवाड (Shiva Gaikwad) यांना गुन्ह्यातील आरोपी सराईत असुन तो बारामती येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता आरोपी पुण्यात गेल्याची माहिती मिळाली. तसेच तो स्वारगेट परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी स्वारगेट एसटी स्टँड परिसरात सापळा रचून रात्री दहाच्या सुमारास ताब्यात घेतले. आरोप सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 3 खुनाचे व इतर 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बावचे (API Ashwini Bavche)करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (Addl CP Pravin Kumar Patil),
परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil),
सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)

यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर (Senior PI Ashok Indalkar),
पोलीस निरीक्षक गुन्हे सोमनाथ जाधव (PI Somnath Jadhav),
सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे (API Prashant Sande),
पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले (PSI Ashok Yewle) पोलीस
अंमलदार मुकुंद तारु, शिवा गायकवाड, फिरोज शेख, रमेश चव्हाण,
संदीप घुले, अनिस शेख, दिपक खेंदाड, सुरज पवार, प्रविण गोडसे,
महिला पोलीस शिपाई सांगोलकर यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime News Swargate police arrested a rickshaw driver who broke a passenger’s earlobe

ACB Trap Case News | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सहायक उद्यान निरीक्षक आणि उपलेखापाल लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Related Posts