IMPIMP

Pune Crime News | पुण्यात कोयता गँगची दहशत कायम! फटाके फोडण्यावरुन तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार

by sachinsitapure
Koyta Gang Attempt to kill

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुणे शहरातील कोयता गँगची (Koyta Gang) दहशत अद्याप संपलेली नाही. काही दिवसांपूर्वी टिळक रोडवर अनोळखी तरुणांनी एका तरुणावर कोयत्याने वार करुन जखमी केले होते. ही घटना ताजी असतानाच मार्केट यार्ड परिसरात फटाके फोडण्यावरुन तीन जणांनी एका तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Pune Police) तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत कुमार राम कांबळे (वय-20 रा. आंबेडकर नगर मार्केटयार्ड) याने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार फय्युम फिरोज खान (वय-20), शाहरुख सलीम खान (वय-21), साहील (सर्व रा. आंबेडकर नगर) यांच्यावर आयपीसी 307, 323, 504, 34 सह आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.12) रात्री अकराच्या सुमारास मार्केटयार्ड येथील गल्ली नंबर 11 येथे घडला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी कुमार कांबळे व त्याचा मित्र प्रथमेश हे गिरधरे यांच्या दुकानासमोर फटाके फोडत होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी प्रथमेश याला फटाके फोडण्यास मनाई केली. तसेच वाद घालून शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी सोबत आणलेल्या कोयत्याने प्रथमेश याच्या डोक्यात वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
तर इतर आरोपींनी हवेत कोयते नाचवुन परिसरात दहशत निर्माण केली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts