IMPIMP

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नागपुर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची आतापर्यंत 60 जणांवर कारवाई

by nagesh
Pune Cyber Crime | Fake loan app call center busted by Pune Cyber police; 18 accused arrested, confidential data of one lakh people in hands of police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरातील (Pune Crime) उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या (Uttam Nagar Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 60 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार प्रसन्न उर्फ बाळा मनोज कदम Prasanna alias Bala Manoj Kadam (वय – 21 रा. फ्लॅट नं. 302, तीसरा मजला, शांतीबन सोसायटी, शिवणे, ता. हवेली) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे (Criminal) नाव आहे.
प्रसन्न उर्फ बाळा कदम याला एमपीडीए कायद्यान्वये नागपुर कारागृहात (Nagpur Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Crime)

 

प्रसन्न उर्फ बाळा मनोज कदम हा सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोयता यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न (Attempted Murder),
गंभीर दुखापत करणे, दंगा, विनापरवाना हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत.
मागील पाच वर्षात त्याच्यावर 04 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रसन्न उर्फ बाळा मनोज कदम याच्यावर एमपीडीए अ‍ॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले.
उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर (Senior Police Inspector Sunil Jaitapurkar),
पी. सी. बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude)
यांनी ही कामगिरी केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात 60 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी मोक्का (MCOCA Action) Mokka, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Police Commissioner Amitabh Gupta has so far taken action against 60 persons under the MPDA Act

 

हे देखील वाचा :

Mouni Roy Latest Bold Photo | मौनी रॉयनं रात्री समुद्र किनारी दिल्या सिजलिंग पोज, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

Nawab Malik | नवाब मलिकांना तुरूंगात ‘बेड’ आणि ‘खुर्ची’ची मुभा, मात्र मुक्काम आणखी वाढला !

‘RRR’ Movie Promotion | बहुप्रतिक्षीत ‘RRR’ चित्रपटाचं झालं स्टॅच्यू ऑफ यूनिटीमध्ये प्रमोशन, ठरला पहिला चित्रपट

 

Related Posts