IMPIMP

Pune Crime | पुण्यातील शिवणे गावात टोळक्याचा राडा ! तरुणाला कोयत्याने मारहाण करुन केली गाड्यांची तोडफोड

by nagesh
Pune Crime News | Neighboring hoteliers beat up them for giving free soup on food

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे शहरामध्ये सराईत गुन्हेगारांकडून वाहनांची तोडफोड करण्याचे सत्र सुरुच असून अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पुण्यातील (Pune Crime) शिवणे गावामध्ये (Shivane) प्रविण धनराज सुतार Praveen Dhanraj Sutar (वय – 27) या तरुणाला एका टोळक्याने लोखंडी कोयता, लाकडी बांबू आणि दगडाने बेदम मारहाण (Beating) केली.
तसेच परिसरात आरडाओरडा करुन दहशत निर्माण केली. गुन्हेगारांच्या टोळीने परिसरातील अनेक वाहनांची तोडफोड (Vehicle Vandalism) केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी सचिन दळवी (Sachin Dalvi), सुरज मारवाडा (Suraj Marwada), वाघमारे (Waghmare)
आणि आणखी तीन जणांवर उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार गुरुवारी (दि.5) दुधाने पेट्रोल पंपासमोर रात्री साडे दहाच्या सुमारास घडला.
या घटनेत प्रवीण सुतार हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शिवणे गावातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Pune Crime)

 

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री पंढरीनाथनगर येथे लावलेली गाडी घेण्यासाठी जात असताना आरोपींनी प्रविण सुतार याला मारहाण करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला.
त्यानंतर आरोपींनी जवळच्या सोसायटीमध्ये फिरून हातात कोयते,
बांबू आणि दगड घेऊन तेथील लोकांना शिवीगाळ करुन ‘आम्ही या भागातील भाई आहोत कोणी बाहेर आले तर मारुन टाकू’ अशी धमकी (Threat) दिली.
तसेच आरोपींनी रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक यु. डी. रोकडे (API U. D. Rokade) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | rada of the mob in Shivne village in Pune The youth was beaten with a scythe and the vehicles were vandalized

 

हे देखील वाचा :

Maharashtra Municipal Election 2022 | सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्यात महापालिका निवडणुका होणार का ?; राज्य सरकारच्या बैठकीतील माहिती आली समोर !

Department of Agriculture Raid | बोगस बियाण्यांच्या गोदामावर कृषी विभागाची छापेमारी; 2 कोंटीचा मुद्देमाल जप्त, दोघांवर FIR

Sanjay Raut | जितेंद्र नवलानीवर FIR दाखल झाल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘भविष्यात आमच्या सारख्या लोकांना फार मोठी किंमत चुकवावी लागेल’

 

Related Posts