IMPIMP

Pune Crime | धक्कादायक! महिलेला कॉफीमधून गुंगीचे औषध देऊन बलात्कार, पुण्यातील खराडी परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | Sexual assault on a woman by luring her into marriage, an incident in Kondhwa area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – शहरातील खराडी भागात महिलेला कॉपी मधून गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape) केल्याचे समोर (Pune Crime) आले आहे. भागीदारीत हॉटेल व्यवसायात करण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलेला चर्चेसाठी घरी बोलावले होते. यावेळी तिला कॉफीतून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी पीडित महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) तक्रार (Pune Crime) दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या प्रकरणी अजयसिंग विजयसिंग ठाकूर Ajay Singh Vijay Singh Thakur (वय 31) याला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकूर याची कोरोना काळात नोकरी गेली होती. तो नोकरीच्या शोधात असताना त्याची एका मित्राच्या मार्फत पिडीत महिलेशी ओळख झाली. यानंतर त्यांच्यातील ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. दोघांनी व्यवसायाबाबत चर्चा सुरू केल्या. फिर्यादी महिलेचा केटरिंगचा व्यवसाय होता. त्या दोघांनी हॉटेल सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. (Pune Crime)

 

यासाठी ठाकूरने महिलेला खराडी परिसरातील आपल्या घरी चर्चेसाठी बोलवले.
पीडित महिला आरोपीच्या घरी गेली असता त्याने कॉफीबाबत विचारणा केली.
त्यावेळी महिलेने कॉफीसाठी होकार दिला. ठाकूरने महिलेला कॉफीतून गुंगीचे औषध दिले. त्यामुळे महिला बेशुद्ध पडली. त्या दरम्यान आरोपीने महिलेवर बलात्कार केल्याचे समोर आले. हा प्रकार शुद्धीवर आल्यानंतर महिलेच्या लक्षात आला आणि तिने पोलिसांत धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दिली.

 

Web Title :- Pune Crime | raped by giving drug in coffee incident in pune

 

हे देखील वाचा :

Pune RTO | नागरिकांनी ‘रॅपीडो अ‍ॅप’ वापरु नये, पुणे प्रादेशिक परिवहनकडून आवाहन

Shambhuraj Desai | पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना – शंभूराज देसाई यांची माहिती

Supriya Sule | महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत गलिच्छ झालयं; आदित्य ठाकरेंवरील आरोपावर सुप्रिया सुळे यांचे भाष्य

 

Related Posts