IMPIMP

Shambhuraj Desai | पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना – शंभूराज देसाई यांची माहिती

by nagesh
Shambhuraj Desai | Measures to prevent accidents on Pune-Mumbai Expressway - Information by Shambhuraj Desai

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन   पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर (Pune-Mumbai Expressway) अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत. वेगावर नियंत्रण, लेन कटिंग टाळणे, अवजड वाहनांनी नियम पाळणे या बाबींकडे लक्ष देण्यात येईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली. विधानसभा सदस्य भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir) यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ते म्हणाले, रस्ते सुरक्षेसंदर्भात सुधारित धोरण यापूर्वीच तयार करण्यात आले आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभाग (Transport Department), पोलिस, महामार्ग पोलिस (Highway Police), राष्ट्रीय रस्ते विकास यंत्रणा (National Road Development System) यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी बैठक घेऊन यंत्रणेला यासंदर्भात निर्देश दिले असल्याची माहिती परिवहन मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली.

 

या महामार्गावर अपघात टाळण्यासाठी जे प्रयत्न करण्यात येत आहेत त्यामुळे सन 2016 पासून
अपघात संख्या आणि अपघातामुळे होणारे मृत्यू यात घट होत असल्याचे दिसून येत आहे.
स्पीड गनची संख्या वाढवणे, अवजड वाहने डाव्या मार्गिके मधूनच जातील याकडे लक्ष देणे याबाबत परिवहन विभाग
आणि महामार्ग पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.
मात्र, अधिक सुरक्षित प्रवासासाठी ज्या उपाययोजना आवश्यक आहेत त्या केल्या जातील, असे देसाई यांनी सांगितले.

 

Web Title :- Shambhuraj Desai | Measures to prevent accidents on Pune-Mumbai Expressway – Information by Shambhuraj Desai

 

हे देखील वाचा :

Supriya Sule | महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत गलिच्छ झालयं; आदित्य ठाकरेंवरील आरोपावर सुप्रिया सुळे यांचे भाष्य

Pune NCP Protest | राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर भव्य मोर्चा

Pune PMC News | पुणे महानगरपालिका सर्व कंत्राटी कामगारांना ‘ईएसआईसी’चे फायदे देण्यासाठी पुढाकार घेईल व प्रयत्न करेल

IPS Rashmi Shukla | रश्मी शुक्ला प्रकरणावरून अजित पवार विधानसभेत आक्रमक

 

Related Posts