IMPIMP

Supriya Sule | महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत गलिच्छ झालयं; आदित्य ठाकरेंवरील आरोपावर सुप्रिया सुळे यांचे भाष्य

by nagesh
MP Supriya Sule | supriya sule criticize bjp leaders over ajit pawars statement

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   Supriya Sule | अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की, महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत गलिच्छ झाले आहे. त्यामुळे मी आणि माझ्यासारखे लोक यावर कधीच काही बोलणार नाहीत.

 

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकणावरून आरोप केले आहेत. रिया चक्रवर्ती हिच्या फोनमध्ये एयू या नावाने एक मोबाईल क्रमांक नोंद होता. त्यावर या हत्येच्या काळाच्या आगे मागे 44 फोन आले होते. हे एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असा दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे. त्यांनी त्यांच्या दाव्याला बिहार पोलिसांच्या तपासाचा दुजोरा दिला आहे. त्यावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत गलिच्छ झाले आहे, यावर मी आणि माझ्यासारखे लोक कधीच काही बोलणार नाहीत, असे सुळे म्हणाल्या आहेत. सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) या प्रकरणावर माफक प्रतिक्रिया दिली. त्यांनी जास्त काही बोलण्यास टाळले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नेमके काय आहे प्रकरण?
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग, महाराष्ट्र पोलीस, बिहार पोलीस अशा तीन तपास यंत्रणांचा तपास सुरू आहे.
याप्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव सुरूवातीच्या काळात होते.
मात्र, आदित्य ठाकरेंना या प्रकरणातून सीबीआयने दोषमुक्त केले होते.
त्यावर आता बुधवारी लोकसभेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा उकरून वर काढला.
शेवाळे म्हणाले, रिया चक्रवर्तीच्या फोन कॉल्सचा तपास केला गेला का? ती महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय नेत्याच्या संपर्कात होती,
तिची त्यांच्यासोबत मैत्री होती, हे खरं आहे का? बिहार पोलिसांच्या तपासात ‘एयू’नावाने नोंद असलेल्या क्रमांकावर 44 फोन आल्याचा उल्लेख आहे.
राजपूतच्या मृत्यूआधी रियाला ‘एयू’ संपर्क क्रमांकावरून 44 फोन आले होते. ‘एयू’चा अर्थ ‘अनन्या उद्धव’ असाकाढण्यात आला. पण बिहार पोलिसांनी केलेल्या तपासात ‘एयू’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा काढण्यात आला आहे, याचाही तपास व्हायला हवा.

 

Web Title :- Supriya Sule | ncp supriya sule slams rahul shevale on aaditya thackeray sushant singh rajput case

 

हे देखील वाचा :

Pune NCP Protest | राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर भव्य मोर्चा

Pune PMC News | पुणे महानगरपालिका सर्व कंत्राटी कामगारांना ‘ईएसआईसी’चे फायदे देण्यासाठी पुढाकार घेईल व प्रयत्न करेल

IPS Rashmi Shukla | रश्मी शुक्ला प्रकरणावरून अजित पवार विधानसभेत आक्रमक

Aurangabad Crime | धक्कादायक ! दिराचा जडला वहिनीवर जीव, पैशांची मागणी करताच केला गेम; औरंगाबाद जिल्ह्यातील घटना

 

Related Posts