IMPIMP

Pune RTO | नागरिकांनी ‘रॅपीडो अ‍ॅप’ वापरु नये, पुणे प्रादेशिक परिवहनकडून आवाहन

by nagesh
Pune RTO | Pune Regional Transport appeals to citizens not to use 'Rapido App'

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   मोटर व्हेईकल ॲग्रीगेटर रुल्स 2020 अनुसार मे. रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा.लि. (Ropan Transportation Services Pvt. Ltd.(Rapido) यांनी दुचाकी व तिनचाकी टॅक्सीसाठी समुच्चयक अनुज्ञप्ती (ॲग्रीगेटर लायसन्स) मिळण्याकरिता केलेला अर्ज जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (Pune RTO) बैठकीत नाकारल्याने नागरिकांनी रॅपीडो अ‍ॅपचा (Rapido App) वापर करू नये आणि परवानाधारक वाहनांचा वापर करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे (Pune RTO) यांनी केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

समुच्चयकाची अनुज्ञप्ती जारी करण्यासंदर्भाने केंद्र शासनाने (Central Government) 27 नोव्हेंबर 2020 रोजी मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. मे.रोपन ट्रान्सपोर्टेशन यांचा दुचाकी व तीन चाकी समुच्चयकाची अनुज्ञप्ती मिळण्याकरिताचा अर्ज प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे (Pune RTO) यांचेकडे 16 मार्च 2022 रोजी प्राप्त झालेला होता. त्यावेळी अर्जदार यांनी सादर केलेली कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने व अर्जदार यांनी सदर त्रुटींची पुर्तता विहित कालमर्यादित केली नसल्याने प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी मे रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. यांचा अर्ज दिनांक 1 एप्रिल 2022 च्या आदेशान्वये नाकारलेला होता.

 

त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दाखल प्रकरणात मे. रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्विसेस यांनी ॲग्रीगेटर लायसन्स (Aggregator License) मिळण्याकरिता केलेल्या अर्जाचा फेरविचार करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने 29 नोव्हेंबर रोजी दिले होते. या पार्श्वभूमीवर मे. रोपन ट्रान्सपोर्टेशन यांनी 30 नोव्हेंबर 2022 रोजी दुचाकी व तिनचाकी टॅक्सी करिता समुच्चयकाची अनुज्ञप्ती मिळण्याकरिता फेर अर्ज सादर केला.

 

सादर केलेल्या फेर अर्जातील केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार त्रुटीची पुर्तता करून घेण्याकरिता मे. रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्विसेस यांना पुरेशी संधी देण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्यात शासनाने किंवा राज्य परिवहन प्राधिकरणाने बाईक टॅक्सी अशा प्रकारची कोणतीही योजना अद्याप राबविलेली नाही व बाईक टॅक्सी प्रकारचा परवाना जारी केलेला नाही. तसेच बाईक टॅक्सी बाबत भाडे आकारणी धोरण अस्तित्वात नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या पार्श्वभूमीवर अर्जदार रोपन ट्रान्सपोर्टेशन यांच्याकडून कायदेशीर बाबींची पूर्तता होत नसल्यामुळे व
कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यामुळे दुचाकी टॅक्स करिता आणि कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यामुळे तीन चाकी टॅक्सी
करिता समुच्चयक लायसन्स देण्याचा त्यांचा अर्ज प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी 21 डिसेंबर रोजीच्या
बैठकीतील निर्णयान्वये नाकारलेला आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी दिली आहे.

 

Web Title :- Pune RTO | Pune Regional Transport appeals to citizens not to use ‘Rapido App’

 

हे देखील वाचा :

Shambhuraj Desai | पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना – शंभूराज देसाई यांची माहिती

Supriya Sule | महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत गलिच्छ झालयं; आदित्य ठाकरेंवरील आरोपावर सुप्रिया सुळे यांचे भाष्य

Pune PMC News | पुणे महानगरपालिका सर्व कंत्राटी कामगारांना ‘ईएसआईसी’चे फायदे देण्यासाठी पुढाकार घेईल व प्रयत्न करेल

 

Related Posts