IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात वृद्ध महिलेचा तिच्या मुलाने व नातवाने कट रचून केला खून, मृतदेहाचे तुकडे करुन फेकले मुळा-मुठा नदीत

by nagesh
Pune Crime | Shocking! In Pune, an old woman was murdered by her son and grandson, the body was cut into pieces and thrown into the Mula-Mutha river

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | सांस्कृतीक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस
आली आहे. आजी घर सोडून जाण्यास सांगत असल्याच्या रागातून आजीचा निर्घृण खून (Brutal Murder) केल्याची धक्कादायक घटना मुंढवा
(Mundhwa) परिसरात घडली आहे. आरोपीने आपल्या 62 वर्षाच्या वृद्ध आजीचा खून करुन मृतदेहाचे तुकडे करुन ते मुळा-मुठा नदीत फेकून देत
पुरावा नष्ट (Pune Crime) करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंढवा पोलिसांनी (Pune Police) गुन्ह्याचा तपास करुन आरोपी नातू आणि मयत महिलेच्या
मुलाला अटक (Arrest) केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उषा विठ्ठल गायकवाड Usha Vitthal Gaikwad (वय-62 रा. म्हसोबानगर, केशवनगर, मुंढवा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मृत
महिलेचा मुलगा संदीप विठ्ठल गायकवाड Sandeep Vitthal Gaikwad (वय-42 रा. गुरुकृपा सोसायटी, केशवनगर, मुंढवा), नातू साहील उर्फ गुड्डु
संदीप गायकवाड Sahil alias Guddu Sandeep Gaikwad (वय-20 रा. म्हसोबानगर, मुंढवा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत
मृत महिलेची मुलगी शितल मनोज कांबळे Shital Manoj Kamble (रा. लोहगाव) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) आई
बेपत्ता असल्याची फिर्याद दिली आहे. आरोपींनी आईचे अपहरण करुन तीच्या जीवाचे बरेवाईट केल्याचा संशय व्यक्त केला होता.

 

आरोपींना न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चेतन जगताप (First Class Judicial Magistrate Chetan Jagtap) यांनी 7 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी संदीप गायकवाड हा एका राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी (National Party Officer) आहे. साहील याने आपल्या आईचा खून करुन पुरावा नष्ट केल्याची माहिती संदीप गायकवाड याला होती. ही माहिती त्याने पोलिसांपासून लपवून ठेवत मुलाला पाठिशी घातले.

 

अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या पोलीस कस्टडीमध्ये सखोल चौकशी केली असता आरोपी साहील हा आजीकडे राहत होता. हे घर व सोन्याचे दागिने हे आजीच्या नावावर आहे. आजी संदीपला घर सोडून जाण्यास सांगत होती. त्यामुळे चिडलेल्या साहीलने 5 ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीडच्या दरम्यान उषा गायकवाड या झोपल्या असताना गळा आवळून खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी व पोलिसांची दिशाभुल करण्याच्या उद्देशाने उषा गायकवाड यांचा मोबाईल कासेवाडी येथे गादीखाली ठेवला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आरोपीने आजीचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी झाड कापण्याचे इलेक्ट्रिक कटर (Electric Cutter) मशीन विकत घेऊन मृतदेहाचे बाथरुममध्ये तुकडे केले. हे तुकडे पोत्यात भरून दुचाकी आणि चारचाकी गाडीतून पहिल्यांदा केशवनगर येथील कचरा डेपो मागील मुळा मुठा नदीपात्रात (Mula Mutha River) टाकले. तसेच थेऊर येथील नदी पुलावरुन वाहत्या पाण्यात टाकले होते. त्यानंतर घरी येऊन कटर आणि रक्ताने भरलेले कपडे मांजरी येथील नदी पात्रात टाकल्याची कबुली दिली. दरम्यान, 23 ऑगस्ट रोजी थेऊर जवळील वाडेगाव येथे एक मानवी उजवा पाय मुळा मुठा नदीच्या कडेला आढळून आला होता. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) गुन्हा दाखल आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil),
सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी (Senior Police Inspector Brahmanand Naikwadi),
पोलीस निरीक्षक गुन्हे प्रदीप काकडे (Police Inspector Pradeep Kakade),
सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे (API Sameer Karpe), पोलीस उपनिरीक्षक धनंजय गाडे (PSI Dhananjay Gade),
अविनाश मराठे (PSI Avinash Marathe), पोलीस अंमलदार संतोष जगताप (Santosh Jagtap),
वैभव मोरे (Vaibhav More), राजु कदम (Raju Kadam), महेश पाठक (Mahesh Pathak),
अमोल चव्हाण (Amol Chavan), दत्ता जाधव (Datta Jadhav), दिनेश भांदुर्गे, सचिन पाटील,
योगेश गायकवाड, राहुल मोरे, निलेश पालवे, सारुक यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Shocking! In Pune, an old woman was murdered by her son and grandson, the body was cut into pieces and thrown into the Mula-Mutha river

 

हे देखील वाचा :

Krushi Utpanna Bazar Samiti Maharashtra Elections | राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Pune Crime | नगरसेवकाकडे 25 लाख रुपये खंडणी मागणारा RTI कार्यकर्ता जितेंद्र भोसलेवर गुन्हे शाखेकडून FIR

Rupali Patil On Chandrasekhar Bawankule | राष्ट्रवादीच्या रूपाली पाटील यांचा भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंवर निशाणा, म्हणाल्या -’ज्याला तिकीट मिळालं नाही तो…’

 

Related Posts