पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली (Married Woman Suicide Case). याबाबत पोलिसांनी (Pune Police) तपास केल्यानंतर ती आत्महत्या असल्याचे निष्पन्न झाले. विवाहितेच्या नातेवाईकांनी आमची काहीही तक्रार नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी न्यायालयात (Pune Shivaji Nagar Court) धाव घेतली. न्यायालयाने खूनाचा (Murder In Pune) गुन्हा दाखल करुन चौकशीचे आदेश दिले आहेत. (Pune Crime)
सोनी मदन ठाकूर Soni Madan Thakur (वय ३४, रा. वृंदावन सोसायटी, चंदननगर – Chandan Nagar ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
याबाबत तिचा भाऊ राजीव श्रीकांत मिश्रा (वय ३६, रा. बाबर्डी गाव, वाघोली) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद (१७७/२२) दिली आहे. त्यावरुन मदन नंदकुमार ठाकूर Madan Nandkumar Thakur (वय ४८), रुबी पाठक (Ruby Pathak), प्रदीप पाठक Pradeep Pathak (वय ३७, रा. खराडी रोड, चंदननगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत (Pune Crime). ही घटना वृंदावन सोसायटीत (Vrindavan Society Pune) २४ व २५ जानेवारी २०२२ रोजीच्या रात्री घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदन ठाकूर हा फिर्यादी यांच्या बहिणीचा पती असून रुबी व प्रदीप पाठक हे नणंद व नणंदेचे पती आहेत. सोनी हिने काही कारणावरुन २४ जानेवारी रोजी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. शवविच्छेदनात गळफास घेऊन मृत्यु झाल्याचा डॉक्टरांनी अहवाल दिला. सोनी हिच्या नातेवाईकांनी तेव्हा कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले.
त्यांचे आणि ठाकूर यांचे सोनी यांच्या पैशांवरुन वाद झाला. त्यानंतर त्यांनी वकिलामार्फत न्यायालयात धाव घेतली.
आपल्या बहिणीचे हातपाय बांधून तिला चार दिवस अन्न पाणी न देता तिचा शारीरीक व मानसिक त्रास दिला.
माहेराहून पैसे आणण्याकरीता तिच्यावर दबाव टाकून यातील आरोपींनी पूर्व नियोजित कट करुन फिर्यादी
यांच्या बहिणीचा खून केला असा दावा त्यांनी न्यायालयात केला.
प्रथम वर्ग न्यायालयाने (JMFC Court Pune) याबाबत गुन्हा दाखल करुन तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक कुमरे तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Suicide by hanging of a married woman in Chandannagar area of Pune; Murder case filed as per pune shivaji nagar court order
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
- Business Idea | ‘या’ फूलाच्या शेतीतून करा लाखो रुपयांची कमाई, जाणून घ्या कशी करावी सुरूवात
- Multibagger Stock | अदानी ग्रुपच्या ‘या’ शेअरने 3 वर्षात 1 लाख रुपयांचे केले 61 लाख रुपये, तुमच्याकडे आहे का?
- Multibagger Stock | 4 रुपयांवरून 4000 रुपयांवर पोहचला ‘हा’ शेअर, 1 लाखाचे झाले 10 कोटी रुपये