IMPIMP

Multibagger Stock | अदानी ग्रुपच्या ‘या’ शेअरने 3 वर्षात 1 लाख रुपयांचे केले 61 लाख रुपये, तुमच्याकडे आहे का?

by Team Deccan Express
Stock Tips | stock investment tips should you buy zomato nykaa and paytm

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | अदानी ग्रुप (Adani Group) चे शेअर सध्या आपल्या गुंतवणुकदारांना जोरदार कमाई करून देत आहेत. अदानी ग्रुपचे काही शेअर गुंतवणुकदारांना सातत्याने चांगली कमाई करून देण्यासाठी ओळखले जातात. अदानी ग्रीन एनर्जी (Adani Green Energy) चा शेअर असाच एक शेअर आहे. अदानी ग्रीन एनर्जी मागील 3 वर्षात 37.40 रूपयांनी वाढून 2279 रूपयांच्या स्तरावर आला आहे. 3 वर्षाच्या कालावधीत त्याने आपल्या शेअरधारकांना 6,000 टक्के रिटर्न दिला आहे. (Multibagger Stock)

 

अदानी ग्रीन एनर्जी शेअर प्राईस हिस्ट्री

अदानी ग्रुपचा हा स्टॉक मागील 1 महिन्यापासून कंसोलिडेशनच्या टप्प्यात आहे. मागील 1 महिन्यात हा स्टॉक सुमारे 2800 रूपयांनी घसरून 2279 रूपयांच्या लेव्हलवर आला आहे. या कालावधीमध्ये हा शेअर सुमारे 20 टक्के घसरला आहे. कॅलेंडर ईयर 2022 मध्ये सुद्धा या स्टॉकने चांगली कामगिरी केली आहे. 2022 मध्ये हा स्टॉक 1347 रूपयांनी वाढून 2279 वर आला आहे. म्हणजे या कालावधीत त्याने सुमारे 70 टक्के रिटर्न दिला आहे. मागील 6 महिन्यात सुद्धा या स्टॉकने 70 टक्के कमाई करून दिली आहे. तर मागील 1 वर्षात अदानी ग्रुपच्या या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 75 टक्के रिटर्न दिला आहे. (Multibagger Stock)

 

17 मे 2019 ला अदानी ग्रीन एनर्जी एनएसईवर 37.40 रूपयांवर बंद झाला होता. तर सध्या तो 2279 रूपयांवर दिसत आहे. म्हणजे या 3 वर्षाच्या कालावधीत या स्टॉकने 61 पट मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे.

 

गुंतवणुकीवर पडलेला प्रभाव

– जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षाच्या सुरुवातीला या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला 70 हजार रुपयांचा रिटर्न मिळाला असता.

– वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज 75 हजार रुपयांचा रिटर्न मिळाला असता.

– जर एखाद्याने 3 वषापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज ते 61 लाख रुपये झाले असते.

– मात्र, जर एखाद्याने 1 महिन्यापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते,
तर त्याला 20 हजार रुपयांचे नुकसान झाले असते आणि त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 80 हजार रुपयांपर्यंत खाली आले असते.

 

अदानी ग्रीन शुक्रवारी 3,60,153 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह बंद झाला.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stock | multibagger stock this share of adani group made
rs 1 lakh in 3 years rs 61 lakh what do you have hotstocks

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Related Posts