IMPIMP

Pune Crime Suicide News | भाजप नेत्याच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलीची पुण्यात आत्महत्या

by nagesh
Pune Crime Suicide News | BJP leader's software engineer daughter commits suicide in Bavdhan Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime Suicide News | गडचिरोली येथील भारतीय जनता पक्षाचे नेते वासुदेव बट्टे आणि माजी नगरसेविका वर्षा वासुदेव बट्टे यांची मुलगी सॉफ्टवेअर इंजिनिअर सायली वासुदेव बट्टे (24, सध्या रा. बावधन, मुळ रा. झाशीनगर, चंद्रपूर रस्ता, गडचिरोली) हिने पुण्यातील बावधन परिसरात गळफास घेऊन आत्महत्या (BJP Leader Daughter Suicide In Bavdhan Pune) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. (Pune Crime Suicide News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या वर्षभरापासून सायली ही पुण्यातील एका आयटी कंपनीमध्ये (Pune IT Companies) कामाला होती. कामाच्या ताणामुळे ती नैराश्यात होती. याच तणावातून तिने शनिवारी (दि.18) रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

काही दिवस सायली ही तिच्या भावासोबत राहत होती. तिचा भाऊ काही दिवसांपुर्वीच गडचिरोली येथे परतला होता.
त्यामुळे सायली ही तिच्या रूमवर एकटीच होती. शनिवारी तिने तिच्या कुटुंबियांना कॉल केला. सर्वांशी ती बोलली.
मात्र, त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात (Hinjewadi Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

 

Web Title : Pune Crime Suicide News | BJP leader’s software engineer daughter commits suicide in Bavdhan Pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | दुचाकीच्या चोरीसाठी भामट्यांची अनोखी शक्कल ! टेस्ट ड्राइव्हचा बहाण्याने दुचाकी पळवली, दिवसाढवळ्या घडला प्रकार

Jalna Crime News | फ्री फायर गेमवरून दोन गटांमध्ये जोरदार राडा; हाणामारीत चाकू अन् खंजीरचा वापर

Salman Khan | अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्याच्या सुरक्षितेत वाढ

 

Related Posts