IMPIMP

Pune Crime | दुर्दैवी ! स्टंटबाजी करणं पडलं महागात, खडकवासला धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

by nagesh
Pune Crime | youth drown in khadakwasla dam after jumping from pump house

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | खडकवासला धरणातील (Khadakwasla Dam) पंप हाऊसजवळ पोहत असताना एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना शनिवारी (दि.7) संध्याकाळी घडली आहे. उंचावर जाऊन पाण्यात उडी मारण्याचा व्हिडिओ (Jumping Video) बनवत असताना ही घटना (Pune Crime) घडली. आशिष सुभाष फुरंगे (Ashish Subhash Furange) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

आशिष फुरंगे (वय-18 रा.कर्वेनगर) हा शनिवारी सायंकाळी दोन मित्रांसोबत खडकवासला धरणात पोहण्यासाठी (Swimming) गेला होता. पाण्यात उडी मारण्याचा व्हिडीओ काढण्यासाठी तो पंप हाऊसच्या कठड्यावर चढला त्यावेळी त्याचा मित्र व्हिडिओ काढत होता.
त्याने पाण्यात उडी मारली मात्र तो वर आला नाही. त्यामुळे त्याच्या इतर मित्रांनी आरडाओरडा करुन लोकांना मदतीसाठी बोलावले. (Pune Crime)

घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तासाठी तैनात असलेले वाहतूक पोलीस (Pune Traffic Police)
विलास बांबळे (Vilas Bamble), प्रवीण ताकवले (Pravin Takwale) यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
तसेच नांदेड सिटी अग्निशमन दलाला (Nanded City Fire Brigade) पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आशिषचा शोध घेऊन त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. उडी मारताना पाण्यात डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title :- Pune Crime | youth drown in khadakwasla dam after jumping from pump house

Join Our 
SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Latur | गुन्ह्यातील मुख्य आरोपीकडून लाच घेणारा पोलीस हवालदारच अडकला लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात!

Samantha Ruth Prabhu Glamorous Look | समंथानं शेअर केला अत्यंत बोल्ड लूक, स्टाईलिश ब्लाऊजवर खिळली नेटकऱ्यांची नजर..

Bhojpuri Actress Monalisa Bikini Photo | भोजपुरी अभिनेत्री मोनालिसानं बिकिनी घालून ओलांडल्या बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा, व्हायरल फोटोनं सोशल मीडियावर लागली आग..

Ajit Pawar | प्रांत अधिकारी 2% कमिशन घेतात, शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर अजित पवारांनी कपाळाला लावला हात अन्…

MBBS Students News | MBBS च्या विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

Pune Crime | संगणक अभियंता महिलेची टिंगल करणं पडलं महागात, उच्चशिक्षित दोन तरुणांना अटक

Related Posts