IMPIMP

Pune Cyber Crime News | पुणे : गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक

by sachinsitapure
Pune Cyber Crime News | in pune additional commissioner of police crime branch social media account is hacked

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Cyber Crime News | सायबर गुन्हेगारांकडून (Cyber Criminal) अनेक बड्या नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक (Social Media Account Hack) केली जात आहेत. मात्र आता गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) प्रमुखाचेच सोशल मीडिया अकाऊंट सायबर गुन्हेगारांनी हॅक केल्याचे समोर आले आहे. पुणे पोलीस (Pune City Police) दलातील गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokle) यांचे सोशल मीडिया अकाऊंट हॉक केले असून, नागरिकांनी हॅक केलेल्या खात्यातील मजकूरास प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Pune Cyber Crime News) यांनी केले आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन टास्कचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याच्या घटना घडत आहेत. सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक (Cheating Case) करतात. त्यातच आता सायबर चोरट्यांनी चक्क गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. (Pune Cyber Crime News)

पोकळे यांच्या नावाने काही परिचित, नागरिकांना चोरट्यांनी फ्रेंड रिक्वेस्ट (Friend Request) पाठवल्याचे समोर आले आहे. खाते हॅक केल्यानंतर चोरटे संदेश पाठवून नागरिकांची फसवणूक करु शकतात. त्यामुळे चोरट्यांनी पाठविलेल्या संदेशाकडे दुर्लक्ष करावे. तसेच त्यास प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन रामनाथ पोकळे यांनी नागरिकांना केले आहे.

गेल्या आठवड्यात पुणे शहर पोलीस दलातील एका पोलीस निरीक्षकाच्या (PI)
नावाने सायबर चोरट्यांनी त्यांच्या पुतणीला मेसेज पाठवून फसवणूक केली होती.
अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांप्रमाणे पोलिसांची सोशल मीडियावरील खाती देखील सुरक्षित नसल्याचे उघडकीस आले आहे.

Web Title : Pune Cyber Crime News | in pune additional commissioner of police crime branch
social media account is hacked

 

Related Posts