IMPIMP

Pune Cyber Police Arrest Cryptobiz CEO Rahul Rathod | Crime News : पुणे सायबर पोलिसांकडून लॅपटॉप, पेनड्राईव्ह जप्त ! क्रिप्टोब्रिझच्या राहुल राठोड, ओमकार सोनवणेला 18 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी

by nagesh
Pune Cyber Police Arrest Cryptobiz CEO Rahul Rathod | Pune Crime News: Pune cyber police seized laptop, pen drive! Cryptobiz's Rahul Rathod, Omkar Sonawane remanded to police custody till April 18

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन Pune Cyber Police Arrest Cryptobiz CEO Rahul Rathod | ऑनलाइन गुंतवणुकीच्या बहाण्याने कोलकत्ता,
बेंगलोर, दिल्ली, चेन्नई, मुंबई आणि पुण्यातील अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) अटक केलेल्या राहुल
विजयभाई राठोड Rahul Vijaybhai Rathod (35, रा. फ्लॅट नं. 3004, टॉवर नं. 18, ब्ल्यूरिच सोसायटी, हिंजवडी, फेज-1, पुणे. मुळ रा. गुजरात)
(Owner Of CryptoBiz Arrested) आणि ओमकार दिपक सोनवणे Omkar Deepak Sonwane (25, रा. एफ-702, एलिना लिव्हींग,
एन.आय.बी.एम. रोड, कोंढवा) यांना न्यायालयाने (Pune Shivajinagar Court) दि. 18 एप्रिल 2023 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला
आहे (Pune Crime News). दरम्यान, पुणे सायबर पोलिसांनी त्यांच्याकडून 2 दुचाकी, 1 चारचाकी, लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट मोडेम, पेनड्राईव्ह
आणि इतर महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. (Pune Cyber Police Arrest Cryptobiz CEO Rahul Rathod)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बीकॉम सायबर लॉ चे प्रशिक्षण घेतलेल्या राहुल राठोडने तंत्रज्ञानाचा वापर करून क्रिप्टोब्रिझ ही कंपनी स्थापन केली. त्याद्वारे क्रिप्टोब्रिझ एक्सचेंजच्या माध्यमातून युट्युबवर ऑनलाइन प्रसिद्धी करत, देशभरात अनेक गुंतवणूकदारांची गुंतवणूक घेत त्यांना कोट्यावधीचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे सायबर पोलिसांनी संबंधित आरोपीस पळून जाण्याच्या तयरीत असताना त्यांना अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडे रवि शंकर पाटील (वय -32 ,रा. इस्लामपूर, जिल्हा सांगली) यांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली होती. (Pune Cyber Police Arrest Cryptobiz CEO Rahul Rathod)

 

राहुल राठोड याने 2019 पासून क्रिप्टोब्रिझ या कंपनीची स्थापना केली. गुंतवणूकदारांना एक्सचेंजच्या माध्यमातून अल्पावधीत अधिक परतावा देण्याचे त्यांनी अमिष दाखवले. त्याकरीता गोल्ड ,सिल्वर, प्लॅटिनम, ट्रायल असे वेगवेगळे गुंतवणुकीचे प्लॅन तयार करण्यात आले. त्यासाठी ठराविक दिवसात ठराविक टक्के परतावा मिळेल असे सांगण्यात आले. उदाहरणार्थ प्रतिदिन 1, 1.5, 2 टक्के अशा प्रकारचा परतावा मिळेल असे आमिष दाखवले गेले. ट्रेडर्स डेस्टिनेशन या नावाने युट्युबवर त्याने ऑनलाईन व्हिडिओ करत अनेकांना भुरळ घालून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. गुंतवणूक करणाऱ्यांना यूएसडी कॉईन मध्ये एक रुपयाचे डिस्काउंट मिळेल असे ही सांगण्यात आले. त्यानुसार देशभरातील विविध शहरातून गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना सुरुवातीच्या काळात त्यांनी काही टक्केवारीने रक्कमा दिल्या. त्यामुळे लोकांचा विश्वास संपादन होऊन अनेकांनी मोठ्या प्रमाणात पैशांची गुंतवणूक क्रिप्टोब्रिझ या कंपनीत केली. मात्र, हळूहळू गुंतवणूकदारांना परतावा देण्याचे बंद करत, आरोपीने पुण्यातील कोंढवा परिसरातील त्याचे कार्यालय ही बंद केले.

 

कोलकत्ता, बेंगलोर, दिल्ली, चेन्नई, मुंबई आणि पुण्यातील गुंतवणूकदारांनी एकत्रित येत पुणे सायबर पोलिसांकडे याबाबतची तक्रार दिली.
त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर अवघ्या 24 तासात राहुल राठोड आणि ओमकार सोनवणेला अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दि. 18 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदिप कर्णिक, गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे,  आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिनल सुपे-पाटील, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलिस उपनिरीक्षक तुषार भोसले, पोलिस उपनिरीक्षक सचिन जाधव, पोलिस उपनिरीक्षक संदीप कदम, पोलिस अंमलदार राजकुमार जाबा, संतोष जाधव, नवनाथ कोंडे, प्रवीण राजपुत, बापु लोणकर, नवनाथ जाधव, निलेश लांडगे, बाळासाहेब कराळे, पुजा मांदळे, सोनाली चव्हाण आणि सुनयना मोरे यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title :- Pune Cyber Police Arrest Cryptobiz CEO Rahul Rathod | Pune Crime News: Pune cyber police seized laptop, pen drive! Cryptobiz’s Rahul Rathod, Omkar Sonawane remanded to police custody till April 18

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वानवडी पोलिसांकडून खासगी प्रवासी बसमधील महिलांचा ऐवज चोरणार्‍या गंगाखेडच्या ( जि. परभणी) दोघांना अटक

Ajit Pawar | अजित पवार-अमित शाह यांची भेट? विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले- ‘…अशा भेटी लपून राहत नाहीत’

DY Patil University | डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी : ‘होनहार भारत -पोटँशियल युनिकॉर्नस ऑफ इंडिया’ विषयावरील परिषदेला चांगला प्रतिसाद; उद्यमशील कंपन्या, नवउद्योजकांना ‘होनहार भारत’ पुरस्कार प्रदान

 

Related Posts