IMPIMP

Pune Drug Case | ससून ड्रग रॅकेट : सुषमा अंधारेंना नाशिकहून निनावी पत्र; ललित पाटील प्रकरणाच्या धक्कादायक माहितीचा दावा

by sachinsitapure
Sushma Andhare

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Drug Case | शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray Group) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना एक निनावी पत्र आले असून या पत्रात ससून ड्रग रॅकेट प्रकरणातील (Sassoon Drug Racket Case) मुख्य आरोपी ललित पाटील (Lalit Patil) याच्याबद्दल धक्कादायक माहिती आहे, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी काल पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांची भेट घेऊन हे पत्र त्यांच्या स्वाधीन केले. तसेच या पत्राच्या अनुषंगाने तपास करावा अशी मागणी केली. (Pune Drug Case)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर अंधारे यांनी या निनावी पत्राबाबतची माहिती पत्रकारांना दिली. सुषमा अंधारे म्हणाल्या, नाशिकवरून एक निनावी पत्र आले आहे. त्यात काही राजकीय आणि इतरांची नावे आहेत. मात्र, त्याबाबतचे पुरावे नाहीत. त्यामुळे हे पत्र पोलीस आयुक्तांकडे देण्यात आले आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, ललित पाटील प्रकरणाचा तपास करून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) त्याला बाहेर ससून रूग्णालयातून कोणी दाखल करण्यासाठी कोणी प्रयत्न केले. ससून रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांची चौकशी व्हायला हवी. अमली पदार्थ विक्री गंभीर प्रकरण आहे. (Pune Drug Case)

या प्रकरणातील एका व्हिडिओबाबत माहिती देताना अंधारे म्हणाल्या, काही दिवसांपूर्वी मी समाजमाध्यमात
एक ध्वनिचित्रफीत प्रसारित केली होती. त्या व्हिडिओत न्यायालयातून ससूनमध्ये नेण्यात येणाऱ्या कैद्यांना
बंदोबस्तावरील पोलीस पाकीट देत असल्याचे आढळून आले होते. याप्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी
पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती.

Related Posts