IMPIMP

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचा भाव

by nagesh
Pune Gold Rate Today | Gold and silver rates rose again; Know today’s price

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Pune Gold Rate Today | सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सातत्याने चढ-उतार होताना दिसत असतात. बुधवार (दि. ७ जून) रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली असल्याचे पाहायला मिळाले. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 54 हजार 908 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर (Pune Gold Rate Today) 59 हजार 900 रुपये आहे. मंगळवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59,820 (24 कॅरेट) रूपये होता. आज त्यामध्ये वाढ दिसून आली आहे. (Gold-Silver Price on 7 June 2023)

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे संपूर्ण भारतात सोन्याच्या दागिन्यांच्या किमती बदलत असतात. सराफा बाजाराच्या वेबसाइटनुसार चांदी 71,980 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. मागील व्यवहारात चांदीचा भाव 72,150 रुपये प्रति किलो होता.

आजचा सोन्याचा भाव…

मुंबई (Mumbai)-
22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,908 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,900 रूपये

पुणे (Pune) –
22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,908 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,900 रुपये

नागपूर (Nagpur) –
22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,908 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,900 रुपये

नाशिक (Nashik) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,908 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,900 रुपये

कशी तपासावी सोन्याची शुद्धता?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी अ‍ॅप तयार करण्यात आले. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (‘BIS Care App) या अ‍ॅप द्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅप च्या मदतीने तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याबाबतच्या तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅप वरून तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅप च्या माध्यमातून ग्राहकाला तत्काळ तक्रार दाखल करण्याची माहितीही मिळणार आहे.

Web Title : Pune Gold Rate Today | Gold and silver rates rose again; Know today’s price

Related Posts