IMPIMP

Pune Hadapsar News | पुणे : हडपसरमधील नऊ वर्षाच्या प्रणवने केला विश्वविक्रम

by nagesh
Pune Hadapsar News | Pune: Nine-year-old Pranav from Hadapsar broke the world record

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Hadapsar News | जयवंत पब्लिक स्कूलमध्ये (Jayawant Public School) चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या अवघ्या ९ वर्षाच्या प्रणव प्रविण गुंड (Pranav Pravin Gund) याने एक नवा विश्वविक्रम (World Record) केला आहे. त्याची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये (International Book of Records) नुकतीच झाली आहे. प्रणव याने महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांची नावे ३९ सेकंदात बोलत हा विक्रम प्रस्थापित केला आहे. अशा प्रकारचा विश्वविक्रम होण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रणवच्या नावाने ह्या विश्वविक्रमाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद झाली आहे. (Pune Hadapsar News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रणव गुंड हडपसरमधील ड्रीम्स आकृती सोसायटीमध्ये (Dreams Aakruti Hadapsar) राहत असून, त्याचे आई-वडील दोघेही डॉक्टर आहेत. आई डॉ. मीनाक्षी गुंड (Dr. Meenakshi Gund) आयुर्वेद चिकित्सक आहे, तर वडील डॉ. प्रविण गुंड (Dr Pravin Gund) हे पुण्यातील रसायु कॅन्सर क्लिनिकमध्ये कार्यरत आहेत. मुलाने केलेल्या कामगिरीमुळे आई वडील समाधानी आहेत व भावी आयुष्यात त्याला प्रोत्साहन देण्याच्या संकल्प त्यांनी दिला आहे. (Pune Hadapsar News)

 

प्रणवच्या आई वडिलांनी भावना व्यक्त करताना सांगितले की प्रणव लहानपणापासून हुशार आहे. तो पटकन गोष्टी आत्मसात करतो. प्रणव चार वर्षाचा असताना तो विविध शहर, राज्य यांची नावे घेत असे व ती वारंवार बोलण्याचा प्रयत्न करत असे. त्याच्यामधील स्मृती व सातत्य लक्षात घेवुन त्याला प्रोत्साहन दिले. नुकतेच त्याने स्केटिंगमध्ये जिल्हा स्तरावर गोल्ड मेडल मिळवले आहे. क्यूब सोडविण्यातही त्याला रस असून, तो त्याचा नियमित अभ्यास करत आहे.

 

प्रणवच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तो शिकत असलेल्या शाळेच्या प्रिन्सिपल यांनी त्याचे फोन करून विशेष अभिनंदन केले. त्याच्या समवयस्क मुलासाठी ती एक प्रेरणा स्त्रोत बनला आहे. त्याने केलेला विश्वविक्रम ह्याचा व्हिडिओ इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या यूट्यब चॅनलवर अपलोड झाला आहे. तसेच इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या अधिकृत सर्व प्लॅटफॉर्म वर हा विश्वविक्रम प्रकाशित झाला आहे. प्रणव इथे न थांबता नवनवीन गोष्टी आत्मसात करून पुढे जाण्याच्या तयारीत आहे व ते नक्की करेन, असे विश्वासाने प्रणवने सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :  Pune Hadapsar News | Pune: Nine-year-old Pranav from Hadapsar broke the world record

 

हे देखील वाचा :

CSR Award-2023 – Sudarshan Chemical | राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुदर्शन केमिकल्सला ‘सीएसआर अवॉर्ड-2023’ प्रदान

MSRTC – Mumbai To Alandi ST Bus | भाविकांसाठी खुशखबर ! मुंबई ते आळंदी बससेवा सुरू, जाणून घ्या वेळापत्रक आणि मार्ग

Ahmednagar ACB Trap | अहमदनगर अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग – 36 हजाराची लाच घेताना तलाठी, टायपिस्ट एसीबीच्या जाळयात

 

 

Related Posts