IMPIMP

MSRTC – Mumbai To Alandi ST Bus | भाविकांसाठी खुशखबर ! मुंबई ते आळंदी बससेवा सुरू, जाणून घ्या वेळापत्रक आणि मार्ग

by nagesh
MSRTC – Mumbai To Alandi ST Bus | Mumbai To Alandi Bus Service Started By MSRTC; Check Timetable And Route Below

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – MSRTC – Mumbai To Alandi ST Bus | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून भाविकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता मुंबई ते आळंदी (Alandi-Devachi Pune) एसटी बससेवा दि. 21 एप्रिल 2023 पासुन सुरू झाली आहे. शुक्रवारी मुंबई येथून सकाळी 7 वाजता सुटलेली पहिली बस आळंदी तीर्थक्षेत्र येथे दुपारी दीड वाजता पोहचली. मुंबई सेंट्रल (Mumbai Central) येथून दररोज सकाळी 7 वाजता एसटी बस सुटणार असून दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ती आळंदीमध्ये पोहचणार आहे. दरम्यान, दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास ही बस आळंदी येथुन पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. (MSRTC – Mumbai To Alandi ST Bus)

 

राज्याच्या विविध भागातून भाविक हे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी आळंदीमध्ये येतात. आळंदी हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी आहे. मुंबई येथून येणार्‍या भाविकांची संख्या मोठया प्रमाणात असते. एसटी बस नसल्यामुळे हजारो भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन एसटी महामंडळाने ही बस सेवा दि. 21 एप्रिल 2023 पासुन सुरू केली आहे. या एसटी बस सेवेचा मुंबईतील भाविकांना मोठया प्रमाणावर फायदा होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एसटी बसचा मार्ग खालील प्रमाणे असेल –

मुंबई सेंट्रल ते देवाची आळंदी – भायखळा (प.) – काळाचौकी – दादर – कुर्ला – घाटकोपर (प.) – मानखुर्द – शिवाजीनगर
(गोवंडी) – सानपाडा – नेहरूळ (एल.पी.) – कामोठे – कळंबोली – पनवेल – खोपोली – कार्ला फाटा – तळेगांव डेपो – भंडारा
डोंगर – देहू फाटा, श्री क्षेत्र देहू – मोशी – आळंदी देवाची. दरम्यान, हाच मार्ग परतीचा असणार आहे.

 

 

Web Title : MSRTC – Mumbai To Alandi ST Bus | Mumbai To Alandi Bus Service Started By MSRTC; Check Timetable And Route Below

 

हे देखील वाचा :

Pune News | पुणे : सुहास पटवर्धन – सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाबाबत शासनाच्या धोरणाची संपूर्ण अंमलबजावणी व्हावी

Ahmednagar ACB Trap | अहमदनगर अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग – 36 हजाराची लाच घेताना तलाठी, टायपिस्ट एसीबीच्या जाळयात

Jaykar Library Pune University | विद्यापीठाच्या अनेक पिढ्या घडविणारे जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र ! जागतिक पुस्तक दिन विशेष : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र

 

Related Posts