IMPIMP

Pune Lodha Belmondo Project | लोढा ग्रुपच्या मॅक्रोटेक डेव्हलपर्स लि. कंपनीकडून शेकडो फ्लॅटधारकांची फसवणूक झाल्याचा आरोप; 22 जानेवारीला आंदोलनाचा इशारा

by nagesh
Pune Lodha Belmondo Project | Lodha Group's Macrotech Developers Ltd.Allegation that hundreds of flat holders were cheated by the company; Warning of agitation on January 22

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Lodha Belmondo Project | पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune-Mumbai Expressway) गहुंजे येथील
लोढा बेलमोंडो या प्रकल्पातील 2800 फ्लॅटधारकांची विकसक व राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister Mangalprabhat
Lodha) यांच्या लोढा ग्रुपच्या मॅक्रोटेक डेव्हलपर्स लि. (Macrotech Developers Ltd.) या कंपनीने फसवणूक (Fraud) केल्याचा आरोप
फ्लॅटधारकांनी केला आहे. या विरोधात 22 जानेवारी रोजी आंदोलन करण्याचा इशारा फ्लॅट धारकांनी दिला आहे. तसेच ही लढाई रस्त्यावर आणि
न्यायालयात लढण्याचा निर्णय बेलमोंडो प्रकल्पातील (Pune Lodha Belmondo Project) ग्राहकांनी घेतल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) अ‍ॅड. श्रीराम पिंगळे (Adv. Shri Ram Pingle) यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुणे येथील लोडा बेलमोंडो प्रकल्पातील (Pune Lodha Belmondo Project) 2800 हून अधिक फ्लॅट खरेदीदारांची फसवणूक व विश्वासघात केला गेला आहे. ग्राहकांना विश्वासात न घेता करारनामा (Agreement) योग्य प्रक्रियेने केला नाही. मेन्टेन्सच्या नावाखाली अवाजवी रक्कम वसूल केली जात आहे, बांधकामाची गुणवत्ता राखलेली नाही, सोसायटीची स्थापना केलेली नाही, कन्व्हेन्स डीड (Conveyance Deed) करुन दिले नाही, ग्राहकांनी बनवलेली व नोंदणी केलेली सोसायटी व फेडरेशनची नोंदणी रद्द करायला लावली, वारंवार मागणी करुन देखील मेन्टन्सचा हिशोब दिला नाही, असे अनेक प्रकार या प्रकल्पात सुरु असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.

 

कॅबिनेट मंत्री व विकसक लोढा यांनी मोफा (MOFA) व रेरा कायद्याची (Rera Act) पयमल्ली केली आहे. करारनाम्यात दिलेल्या तारखांना फ्लॅट दिलेला नाही. प्रकल्प व इमारत पूर्ण झाल्यानंतर चार महिन्यात सोसायटी स्थापन करुन कन्व्हेन्स करुन देणे अपेक्षित असताना विकसक व कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून मनमानी केली जात असल्याचे पत्रकात म्हटले आहे. तसेच इन्शुरन्स पॉलिसीच्या (Insurance Policy) कॉपी वारंवार मागूनही त्या दिल्या नाहीत. स्वत:च्या लोनचा इन्शुरन्स खर्च सोसायटीच्या खात्यातून केला जात असून अद्याप लेखापरीक्षण केले नसल्याचे पत्रकात नमूद केले आहे.

 

प्रकल्पातील ग्राहकांनी याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता,
त्यांना वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांकडून जाणीवपर्वक त्रास दिला जात आहे.
संबंधित पोलीस, स्थानिक प्रशासन व राजकारणी व संबंधीत शासकीय यंत्रणा देखील
कॅबिनेट मंत्री व विकसक मंगलप्रभात लोढा यांच्या बाजूने काम करत असून शासकीय यंत्रणांचा होत
असलेला गैरवापर बंद करावा अशी मागणी फ्लॅट खरेदीदारांनी केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Lodha Belmondo Project | Lodha Group’s Macrotech Developers Ltd.Allegation that hundreds of flat holders were cheated by the company; Warning of agitation on January 22

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमांना पंकजा मुंडे का उपस्थित राहत नाहीत? यावर स्पष्टच बोलल्या पंकजा मुंडे, म्हणाल्या…

Pune Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलातील 12 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; इंदापूर, यवत, जुन्नर, शिक्रापूर, खेड, बारामती तालुका, दौंड, आळेफाटा पोलिस ठाण्यात नियुक्त्या

Pune Crime News | ठेकेदाराचे अपहरण करुन पळवून नेणार्‍या चौघांना पाठलाग करुन केले जेरबंद

 

Related Posts