IMPIMP

Pune-Mumbai Expressway Accident | पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात; चौघे जागीच ठार

by nagesh
 Pune Accident News | A 3-year-old girl was killed in a collision with a garbage truck

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune-Mumbai Expressway Accident | पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात (Pune-Mumbai
Expressway Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव कारने मालवाहू ट्रकला (Car – Truck Accident) पाठीमागून जोरदार धडक
दिल्यानं भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात कारमधील चौघे जागीच ठार (Died) झाल्याचे समजते. हा अपघात आज (शनिवारी) दुपारी
4.15 वाजताच्या दरम्यान घडला. दरम्यान, मृतांची ओळख अद्याप पटली नसून संबंधिक कार मुंबईच्या दिशेने जात होती असं सांगण्यात येत आहे. या
घटनेमुळे घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत माहिती अशी की, आज (शनिवारी) दुपारी 4.15 वाजताच्या सुमारास स्कोडा कंपनीच्या कारने गहूंजेच्या क्रिकेट स्टेडियम (Gahunje Cricket Stadium) समोरच उभा असलेल्या ट्रकला जोरात धडक दिली आहे. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती आहे. (Pune-Mumbai Expressway Accident)

 

दरम्यान, अपघात झालेली कार सुसाट वेगात असल्याचा अंदाज यंत्रणांकडून वर्तवण्यात आला आहे. कारचालकाने 50 मीटर पासूनच ब्रेक लावल्याचं चाकाचे व्रण मार्गावर स्पष्ट दिसत आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारचा समोरचा भाग चक्काचूर झाला आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांनकडून मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

 

Web Title :- Pune-Mumbai Expressway Accident | pune mumbai expressway accident between car truck accident 4 died on the spot

 

हे देखील वाचा :

Muslim Satyashodhak Mandal | मुस्लिम सत्यशोधक मंडळ ! समविचारी संघटनांच्या वतीने रविवारी आदरांजली सभा

Adv Gunratna Sadavarte | शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरण ! गुणरत्न सदावर्तेंना पोलीस कोठडी

Puneet Balan Group-Friendship Cup | गुरूजी तालिम टायटन्स्, मिडीया रायटर्स, तुळशीबाग टस्कर्स, शितळादेवी सुपरनोव्हाज्, युवा योध्दाज्, नादब्रह्म ड्रमर्स, जोगेश्‍वरी जॅग्वॉर्स संघांची विजयी कामगिरी !

 

Related Posts