IMPIMP

Pune Mundhwa Crime | पुणे : मोबाईल देण्यास नकार दिल्याने चाकूने वार, दोघांना अटक

by sachinsitapure
Crime

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Mundhwa Crime | रिक्षातून आलेल्या चार जणांनी एका तरुणाकडे मोबाईलची मागणी केली. मात्र, त्याने मोबाईल देण्यास नकार दिल्याने चौघांनी तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच धारदार चाकूने हातावर वार करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.7) सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास केशवनगर मुंढवा (Keshav Nagar Mundhwa) येथे घडला.

सारंग गायकवाड उर्फ साऱ्या (वय-19) व ऋषीकेश उर्फ भोऱ्या गोवर्धन कांबळे (वय-23 रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे)
अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अभय उर्फ धनी व हेमंत गायकवाड उर्फ लाला
(वय-23 दोघे रा. सर्वोदय कॉलनी मुंढवा, पुणे) यांच्यावर आयपीसी 394, 324, 504, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत आदित्य दत्तात्रय कांबळे (वय-22 रा. जांभळे प्लॉट, शिंदे वस्ती, केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात
(Mundhwa Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या परिचयाचे आहेत.
गुरुवारी सायंकाळी फिर्यादी हे चिप्स घेण्यासाठी पायी चालत जात होते. त्यावेळी आरोपी रिक्षातुन आदित्य जवळ आले.
त्यांनी आदित्यकडे मोबाईल फोनची मागणी केली. मात्र, त्याने मोबाईल देण्यास नकार दिला.
याचा राग आल्याने आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांच्याकडून मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला.
आरोपींना विरोध केला असता त्यांनी फिर्यादी यांना मारहाण करुन धारदार चाकूने हातावर वार करुन गंभीर जखमी केले.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक टापरे करीत आहेत.(Pune Mundhwa Crime)

Related Posts