IMPIMP

Pune Mundhwa Police | कौटुंबिक वादातून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न, मुंढवा पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

by sachinsitapure
Pune Mundhwa Police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Mundhwa Police | घरगुती कौटुंबिक वादातून होत असलेल्या त्रासामुळे एका युवकाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला (Attempt To Suicide). मात्र, मुंढवा पोलिसांना वेळीच याची माहिती समजल्याने पोलिसांनी युवकाचे मन परिवर्तन करुन त्याचे प्राण वाचवले. हा प्रकार मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोरपडी येथील कवडे रोड येथे रविवारी (दि.21) रात्री दहाच्या सुमारास घडला.विजय भाऊ पासलकर (वय-36) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे नाव आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

मुंढवा पोलीस ठाण्यातील घोरपडी बिट मार्शल प्रवीण होळकर व जगदीश महानवर हे कर्तव्यावर असताना नियंत्रण कक्षाकच्या डायल 112 वर निगडेनगर, लेन नं. 7 फ्लॅट नं. 28 घोरपडी येथे एक व्यक्ती आत्महत्या करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बिड मर्शल होळकर आणि महानवर यांनी तातडीने त्याठिकाणी धाव घेतली. पोलिसांनी आत्महत्या करत असलेल्या विजय पासलकर यांना ताब्यात घेऊन घोरपडी पोलीस चौकीत आणण्यात आले.

पोलिसांनी विजय पासलकर यांच्याकडे आत्महत्या करण्याचे कारण विचारले असता, घरगुती कौटुंबिक प्रॉपर्टीचा वाद सुरु असल्याने मला खूप त्रास होत आहे. म्हणून मला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी माहिती दिली. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी (Sr PI Mahesh Bolkotgi) यांना दिली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पासलकर यांच्या नातेवाईकांशी संपर्क करुन याची माहिती देवून समजावून सांगितले. तेव्हा कॉलर विजय पासरकर यांचे समाधान झाले.

पासलकर यांचे आत्महत्येपासून मन परिवर्तन झाल्याने आत्महत्या करणार नसल्याचे सांगून तसा जबाब पोलिसांना लिहून दिला. मुंढवा पोलिसांनी माहिती मिळताच तात्काळ मदत करुन पालसलकर यांचे समुपदेशन केले. त्यामुळे पालसलकर यांचे आत्महत्या करण्यापासून मन परिवर्तन झाले. मुंढवा पोलिसांनी दाखवलेल्या तत्परता व माणुसकीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त (अति. कार्य.) रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 आर राजा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या सूचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक रासकर, पोलीस अंमलदार प्रवीण होळकर, जगदीश महानवर यांनी केली.

Related Posts