IMPIMP

Pune Municipal Corporation (PMC) | उजनी धरणातील पाणी प्रदूषित; पुणे महापालिकेचे 15 कोटी रुपये गोठवले

by nagesh
Pune Municipal Corporation (PMC) | action against pune and pimpri chinchwad municipal corporations pollution ujani dam frozen PMC PCMC

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Municipal Corporation (PMC) | उजनी जलाशयामध्ये (Ujani Dam) पुणे (Pune) आणि पिंपरी – चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरामधून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे धरणातील पाणी प्रदूषित झाले आहे. उजनीमधील पाण्यात घरगुती सांडपाण्याशी संबंधित घटक मर्यादेपेक्षा अधिक आढळून येताना दिसत आहे. या दरम्यान पुणे महानगरपालिकेचे Pune Municipal Corporation (PMC) जवळपास पंधरा कोटी रुपये गोठविण्यात आलेय. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेविरोधात Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) कोर्टात दावा दाखल केला गेला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

”उजनी जलाशयात पुणे, पिंपरी – चिंचवड परिसरातून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे धरणातील पाणी प्रदूषित झालेय. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ही बाब अंशत: खरी आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने उजनीतील पाण्याची गुणवत्ता वेळोवेळी तपासली जाते. त्यानुसार उजनी धरणातील पाण्यात रासायनिक पदार्थ आढळून येत नाही. मात्र, या पाण्यात घरगुती सांडपाण्याशी निगडित (टोटल कॉलिफॉर्म व फिकल कॉलीफॉर्म) घटक मर्यादेपेक्षा अधिक आढळून आलेत. मुळा – मुठा नदी व त्यांच्या उपनद्यांच्या प्रदूषणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे जल (प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) कायदा, 1974 कलम-  41 नूसार पुणे महागरपालिकेची Pune Municipal Corporation (PMC) 15 कोटी इतकी रक्कम गोठविण्यात आलीय. त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (Pollution Control Board) महानगरपालिकेला योग्य ते निर्देश देण्यात आलेत.” असं राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी विधिमंडळ अधिवेशनात सांगितलं आहे.

 

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ”याच विषयाला अनुषंगून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अप्रक्रियाकृत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मैला शुद्धीकरण प्रक्रिया संयंत्रणा उभारण्यासाठी पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेला सन 2019, सन 2020 आणि सन 2021 रोजी आदेश दिले आहेत. महानगरपालिकेविरुद्ध जल (प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) कायदा, 1974 अन्वये फौजदारी खटला आणि कोर्टात दावा दाखल केला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.”

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, पुण्याजवळच्या धरण साखळी प्रकल्पातून सोडलेले पाणी उजनी धरणात अडविले जाते.
पुण्यालगतचे शहरीकरण, औद्योगिकीरणाचे सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी पावसाळ्यामध्ये भीमापात्रात सोडून देण्यात येतेय.
उजनी धरण आणि उजनी जलाशयाचे पाणलोट क्षेत्र मोठे आहे.
उजनीच्या पाण्यावर हिरव्या गर्द रंगाचा तवंग दिसून येत असल्याने या दूषित पाण्याचा फटका उजनीजवळच्या शेतकऱ्यांना बसत आहे.
म्हणून या धरणावर अवलंबून असलेला सोलापूर जिल्ह्यातील नागरिक आणि धरणांमधील जलचरांना धोका निर्माण दिसून येत आहे.

 

Web Title: Pune Municipal Corporation (PMC) | action against pune and pimpri chinchwad municipal corporations pollution ujani dam frozen PMC PCMC

 

हे देखील वाचा :

Worlds Largest Temple Virat Ramayan Mandir | मुस्लिम कुटुंबाने सर्वात मोठ्या मंदिराला दान केली 2.5 कोटी रूपयांची जमीन

Aadhaar Card : चुकीचे नाव असो किंवा जन्म तारीख, मिनिटात बदलू शकता; अपडेट करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Maharashtra Rains | राज्यात आगामी 3 दिवस पाऊसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांत अलर्ट

 

Related Posts