IMPIMP

Pune Navale Bridge Accident | ‘पुण्यातील नवले पुलावरील अपघातांचे सत्र कधी थांबणार? शिवसेनेचे ‘NHAI’ कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन

by nagesh
Pune Navale Bridge Accident | navale bridge accident prevention shivsena agitation pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Navale Bridge Accident | मुंबई- बंगळुरू (Mumbai-Bangalore Highway) राष्ट्रीय महामार्गावरील म्हणजेच येथील नवले पुलावर (Pune Navale Bridge Accident) वारंवार अपघात घडतात. नुकतंच काल (मंगळवारी) देखील मोठा अपघात झाला. या अपघातात 3 निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे. यापुर्वीही अनेक अपघात झाले आहेत. या घटनेमध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. तर अनेकजणांचा जीव देखील गेला आहे. अशा वारंवार मोठ्या घटना घडूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (national highway authority of india) आतापर्यंत कोणत्याच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. यामुळे बेजबाबदार प्राधिकरणाचा निषेध करण्यासाठी वारजे येथील राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयावर (NHAI) शिवसेनेकडून (Shiv Sena) जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शिवसेनेकडून आज (बुधवारी) जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी प्राधिकरणाकडून तात्काळ उपाययोजना न केल्यास अधिकाऱ्यांना काळे फासून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाईल, असा इशाराही शिवसेना नेते निलेश गिरमे (Nilesh Girme) यांनी दिला आहे. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी प्रतीकात्मक तिरडी आणि पोतराज यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन केले. यावेळी विजय कणसे (Vijay Kanase), नीलेश पोळ (Nilesh Pol), वैभव थोपटे Vaibhav Thopate), लोकेश राठोड (Lokesh Rathod), आदित्य वाघमारे (Aditya Waghmare), शुभम देशभ्रतार (Shubham Deshbhratar), गौरव देशभ्रतार (Gaurav Deshbhratar), सार्थक जाधव (Sarthak Jadhav), आकाश चव्हाण (Akash Chavan) आदी उपस्थित होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, येथील महामार्गावर असलेल्या तीव्र उतारामुळे मागील काही वर्षात सतत अपघात होत आहेत. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत. याठिकाणी ठोस उपाय नसल्याने शिवसेनेकडून जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.

 

Web Title :- Pune Navale Bridge Accident | navale bridge accident prevention shivsena agitation pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अहमदाबाद ‘सीपी’ विजयसिंग बोलतोय..! पैसे पाठव, पोलिसांना गंडा घालणारा गजाआड

Earn Money | 5000 रुपये खर्च करून घरबसल्या कमवा लाखो रुपये महिना, ताबडतोब जाणून घ्या पद्धत

Anil Deshmukh Money Laundering Case | अनिल देशमुख मुख्य आरोपी ! मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ED कडून 7 हजार पानांचे आरोपपत्र दाखल

 

Related Posts