IMPIMP

Pune Neo Metro | पुण्यासाठी ‘निओ मेट्रो’ महामेट्रोच्या विचाराधीन ! ‘हा’ फायदा होणार, जाणून घ्या

by nagesh
Pune Neo Metro | ‘Neo Metro’ for Pune under consideration! ‘This’ will benefit, you know

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Neo Metro | महामेट्रो पुण्याच्या भविष्याचा ही वेध घेत आहे. मेट्रोच्या तुलनेत कमी किंमत मात्र तितकीच प्रभावी अशी निओ मेट्रो (Pune Neo Metro) आणण्याचा महामेट्रोच्या विचाराधीन आहे. यामुळे वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. नाशिक शहरात देशातील पहिली ‘निओ मेट्रो’ प्रस्तावित आहे. त्यानंतर आता पुणे शहराचा विचार केला जात असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित (dr. brijesh dixit) यांनी दिली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

क्रेडाई पुणे मेट्रोच्यावतीने (credai pune metro) आयोजित करण्यात आलेल्या ३८ व्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी यावेळी महामेट्रोचे
संचालक अतुल गाडगीळ (Director of Mahametro Atul Gadgil), पुणे मेट्रोचे वास्तुविशारद शितेश अग्रवाल (Architect Shitesh Agarwal),
क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे (Credai Pune Metro President Anil Farande), सचिव अरविंद जैन (Arvind Jain), उपाध्यक्ष रणजित
नाईकनवरे (ranjit naiknavare), मनीष जैन (Manish Jain), अमर मांजरेकर (Amar Manjrekar) आदी उपस्थित होते.

दीक्षित म्हणाले, निओ मेट्रोची (Pune Neo Metro) प्रवासी क्षमता ही ताशी १५ हजार प्रवासी इतकी असून मेट्रोच्या तुलनेत तिची किंमत ६० ते ७० कोटी रुपये प्रती किलोमीटर इतकी आहे. मेट्रोच्यावतीने फिडर सर्व्हिस सुविधा विमानतळाबरोबरच इतर सर्व ठिकाणी पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे खासगी वाहनांची वाढती संख्या तसेच वाढणारे वायूप्रदूषणही नियंत्रणात आणणे शक्य होणार आहे. मेट्रो प्रकल्पामुळे पुणे-पिंपरी चिंचवड (Pune and Pimpri-Chinchwad) शहरातील मध्यवर्ती भागासोबतच आजूबाजूचा भाग देखील जोडला जाणार आहे. सर्वोत्तम आणि वेळेची बचत करणारा पर्याय मेट्रोमुळे नागरिकांना निर्माण झाला असल्याने याचा सकारात्मक परिणाम बांधकाम व्यवसायावरही होईल,यावेळी डॉ. दीक्षित यांनी सांगितलं.

मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील बांधकाम व्यवसाय प्रकल्पाचा कसा फायदा होऊ शकेल या विषयावर ते बोलताना दीक्षित म्हणाले, पुणे मेट्रोचे काम कोरोनाकाळातही जोमात सुरु आहे. भविष्यात शहरात मेट्रो धावताना दिसेल. यासोबतच विकास ही गती घेईल. बांधकाम व्यवसाय क्षेत्राला याचा विशेष लाभ होईल. बांधकाम व्यावसायिकांना मेट्रो मार्गावरील प्रकल्पांसाठी वाढीव एफएसआय उपलब्ध होईलच याशिवाय शिवाजीनगर व स्वारगेट येथील मल्टी मोडल स्टेशनचाही फायदा मिळू शकेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

वास्तुविशारद शितेश अग्रवाल म्हणाले की, मेट्रोमुळे शहर बदलत चालले आहे. येणाऱ्या काळात मेट्रो प्रकल्प आणि मेट्रो स्टेशन्सच्या नजीकच्या परिसरात आमूलाग्र बदल होणार आहे.
मेट्रोमुळे शहराच्या कार्यपद्धतीत बदल होणार आहेत.
घरापासून कार्यालयापर्यंत जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेतही मोती बचत होणार आहे.
त्यामुळे शहराची पुनर्रचना करण्यासाठी क्रेडाई सदस्यांकडून आम्ही सहभागाची व एकत्रित काम करण्याची अपेक्षा करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title : Pune Neo Metro | ‘Neo Metro’ for Pune under consideration! ‘This’ will benefit, you know

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | आजही सोन्याच्या किंमती उतरल्या; 10,200 रुपयांनी सोनं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

Pune Metro | पुण्यातील मेट्रोचा बांधकाम क्षेत्राला फायदाच : डॉ. ब्रिजेश दीक्षित

Gold Price Update | सोन्याच्या किमतीमधील मोठ्या बदलाने ग्राहक ‘खुश’, जाणून घ्या नवीन दर

 

Related Posts