IMPIMP

Pune News | ‘बाणेर व बालेवाडी परिसरातील पाणीपुरवठा सूरळीतपणे सुरु ठेवा’ – चंद्रकांत पाटील

by nagesh
Maharashtra Politics News | babri masjid was demolished by shiv sainiks said shinde faction leader sanjay shirsat

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune News | बाणेर व बालेवाडी येथील नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी परिसरातील पाणीपुरवठा
सुरळीतपणे सुरू ठेवण्याच्या सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. (Pune News)

 

विधानभवन येथे शहरातील पाणी पुरवठ्याबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार,
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित
होते. (Pune News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बाणेर व बालेवाडी परिसरातील नागरिकांला ४६ एमएलडी पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येते. या पाईपलाईनद्वारे होणारा पाणीपुरवठा सुरळीतपणे राहण्याच्यादृष्टीने दक्षता घ्यावी. बालेवाडी जकातनाका, पाषाण-बाणेर लिंक मार्ग यांच्यासह आदी पाण्याच्या टाकीचे प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या.

 

मनपा आयुक्त कुमार म्हणाले, वारजे डब्लूटीपी ते बालेवाडी एकूण १८.९४ किलोमीटर लांबीची जलवाहिनी
नियोजित असून त्यापैकी १६.७२ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे.
उर्वरित काम सुरु असून ते लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
तसेच जुने खराब झालेले पंप बदलून त्याजागी वाढीव क्षमेतेचे नवीन पाईप बसविण्यात येत असून
येत्या ६ महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title :- Pune News | ‘Continue water supply in Baner and Balewadi areas smoothly’ – Chandrakant Patil

 

हे देखील वाचा :

Pathaan Controversy | दीपिका पदुकोणचा जुना व्हिडीओ व्हायरल; ” रंगाने धर्म निवडला नाही……”

Pune Crime | धक्कादायक! महिला शौचालयात मोबाईलद्वारे शूटींग, पुण्यातील नामांकित सायन्स रिसर्च इन्स्टिट्यमधील प्रकार

Rakhi Sawant | राखी सावंतच्या ‘या’ कृत्यामुळे ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार? बिग बॉस ने दिली ‘ही’ शिक्षा

 

Related Posts