IMPIMP

Pune News | पुण्यात शेतकरी कुटुंबाची कमाल; मुलीला आदंनात दिले खिल्लार गाय-बैल जोडी

by nagesh
Pune News | farmer family in Pune; The girl was first given a khillar cow-bull pair

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune News | सध्या लग्नाचा सिझन (Wedding Season) चालू आहे. मोठ्या थाटामाटात विवाह सोहळे पार पडत आहेत. लग्नात मुलीला माहेरच्या माणसांकडून अनेक भेटवस्तू (Gifts) प्रेमाने आदंन म्हणून दिल्या जातात. यामध्ये उपयोगी वस्तू, घरातील शोभेच्या वस्तू, भांडी, फर्निचर अशा गोष्टी दिल्या जातात. मात्र फुरसुंगीच्या (Fursungi) एका शेतकरी वडिलांनी या प्रथा मोडत आपल्या मुलीला आदंनात चक्क उच्च जातीच्या गाय आणि बैलाची जोडीच भेट म्हणून दिली आहे. शेतकरी कुटुंबाच्या या अनोख्या पद्धतीमुळे उपस्थित सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

जागतिक दुग्ध दिनाच्या पूर्व संध्येला फुरसुंगी येथे शेतकरी रमेश हरपळे यांची कन्या कल्याणी आणि सोरतापवाडी येथील शेतकरी प्रकाश चौधरी यांचे चिरंजीव यांचा विवाह सोहळा पार पडला. दोन्ही शेतकरी कुटुंबाची ही सोयरीक असल्याने शेतीत उपयोगी असे आदंन देण्यात आले. शहरीकरण वाढले असले तरी दोन्ही कुटुंबे जोमाने शेती व्यवसाय करतात. हीच परंपरा पुढे जपली जावी म्हणून मुलीचे वडील रमेश हरपळे (Ramesh Harpale) व भाऊ नवनाथ हरपळे यांनी आपल्या मुलीला खिल्लार जातीची ही जोडी अनोखी भेट म्हणून दिली. (Pune News)

सध्या सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) बैलगाडा शैर्यतीला परवानगी दिल्याने खिल्लार जातीच्या गाई व बैलांना (Khillar Bulls And Cows ) मोठी मागणी वाढली आहे.
याच पार्श्वभूमीवर मुलीच्या घराच्यांनी मुलीचे दिवे येथील मामा हरिश्चंद्र झेंडे व गुलाब झेंडे यांच्या साथीने लग्नाआधी या जातिवंत खिलार गाई व बैलाची (Khillar breed Bulls ) खरेदी करण्यात आली.
लग्न मंडपात स्टेजच्या बाजूला ‘झाल’ म्हणून ही नटून सजून खिल्लार गाय वासराला बांधण्यात आले.
हे पाहून उपस्थित पाहुणेमंडळी आश्चर्यचकित झाली. अनेकांनी या गाय बैलाच्या जोडीसोबत सेल्फी देखील काढला.

आजच्या शहरीकरणाच्या युगात शेतकरी (Farmer) कुटुंबाने हा नवा पायंडा पाडला आहे.
उच्चशिक्षित मुलीच्या लग्नात दिलेल्या या आदंनामुळे त्यांची मातीशी असलेली घट्ट नाळ दिसून येते.
ही प्रेरणादायी बाब आहे. यावर मुलीचे भाऊ नवनाथ हरपळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले की, ‘माझ्याकडे शर्यतीला पळणारी बैलजोडी आहे. त्यामुळे माझ्या बहिणीलादेखील बैलांची आवड आहे.
म्हणून मी या लग्नात ‘झाली ऐवजी बहिणीला जातीवंत खिल्लार गाय व बैल दिला आहे’.

Web Title : Pune News | farmer family in Pune; The girl was first given a khillar cow-bull pair

Related Posts