IMPIMP

Pune News | पुण्यात विद्युत परिवहनकडून अल्‍टीग्रीनसह लास्‍ट-माइल डिव्हिलरी सर्विसेसचा शुभारंभ

by nagesh
Pune News | Launch of Last-Mile Delivery Services with Altigreen by Electric Transport in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune News | विद्युत वाहनांसह आंतरशहरी माल वाहतूकीवर लक्ष केंद्रित करत पुणे शहराला हरित करण्‍याच्‍या उद्देशासह विद्युत परिवहन ने बेंगळुरू मधील व्‍यावसायिक ईव्‍ही उत्‍पादक अल्‍टीग्रीनसोबत (Altigreen) सहयोगाने लास्‍ट-माइल डिलिव्‍हरी सर्विसेस सुरू केल्‍या आहेत. कंपनीने प्रदूषण-मुक्‍त महाराष्‍ट्रासाठी त्‍यांच्या कार्यसंचालन व विचारसरणींना राज्‍य सरकारचे धोरण व दृष्टिकोनाशी संलग्‍न करण्‍याची प्रबळ योजना आखली आहे. अल्‍टीग्रीन त्‍यांच्‍या रस्‍त्‍यासाठी सुसज्‍ज ईव्‍ही एनईईव्‍हीसह शेवटच्‍या अंतरापर्यंत माल वाहतूकीला परिभाषित करत आहे आणि कंपनी पश्चिम शहरामध्‍ये विश्‍वसनीय सेवा निर्माण करण्‍यासाठी ई-कॉमर्स व एफएमसीजी कंपन्‍यांकरिता लॉजिस्टिक्‍स खर्च लक्षणीयरित्‍या कमी करण्‍यामध्‍ये साह्य करेल. ही एकमेव कंपनी (Pune News) आहे,

इलेक्ट्रिक मोबिलिटीची संधी व लाभ जाणून घेत विद्युत परिवहन वाघोलीमध्‍ये ४० वेईकल चार्जिंग व पार्किंग केंद्र स्‍थापित करत आहे. कंपनीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मित्रा यांच्‍या मते, कंपनी २० व्‍यावसायिक ईव्‍हींसह सुरूवात करत आहे आणि डिलिव्‍हरीसंदर्भात सुलभ कार्यसंचालनांना साह्य करण्‍यासाठी चार्जिंग हब निर्माण करण्‍याची योजना आखत आहे. अल्‍टीग्रीन शहरातील वाहतूकीमध्‍ये ५५० किग्रॅ भार क्षमतेसह दिवसाला १२० किमी अंतर पार करण्‍याची खात्री देते. या सर्वोत्तम कार्यक्षमतेसह पुण्‍यातील बहुतांश ग्राहकांना उत्तम सेवा मिळण्‍याची खात्री (Pune News) आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

लास्ट-माईल डिलिव्हरी आणि लॉजिस्टिक्ससाठी व्यावसायिक ईव्‍हीप्रती असलेल्‍या उत्सुकतेने पुणे शहरात मोठ्या संधी निर्माण झाल्‍या आहेत. पुण्याला हरित बनवणे आणि येथील रस्ते भविष्यासाठी विशेषतः व्यावसायिक ईव्हीसह तयार करणे हा आमचा उद्देश आहे आणि आम्हाला ग्राहकांकडून अभूतपूर्व व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आम्ही एका वर्षासाठी पुणे बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करण्यास उत्सुक आहोत आणि त्यानंतर आम्ही कौशल्‍य व अनुभव वाढवत आमच्या कार्याची व्‍याप्‍ती इतर शहरांमध्ये विस्तारित करू. अल्‍टीग्रीनने भारतीय रस्ते पूर्णपणे इलेक्ट्रिक बनवण्यासाठी देशभरात उत्कृष्ट काम केले आहे. आम्हाला आशा आहे की, आमचा सहयोग आम्हाला शहरातील हरित व किफायतशीर कार्गो डिलिव्हरी सोल्यूशन्सचे सामूहिक ध्येय, तसेच महाराष्ट्र सरकारचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत करेल,” असे विद्युत परिवहन चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मित्रा म्‍हणाले.

लाँचनंतर कंपनी शहरातील कार्बन उत्‍सर्जनाचे प्रमाण कमी करण्‍याप्रती काम करणार आहे.
तसेच कंपनी लास्‍ट–माइल डिलिव्‍हरी व ईव्‍ही विभागांमधील प्रचंड संधींचा लाभ घेत तरूणांकरिता रोजगार संधी निर्माण करण्‍याप्रती काम करत आहे.
सध्‍या, कंपनीने इलेक्ट्रिक ३ वॅट्ससह सुरूवात केली आहे, पण त्‍यांची पोर्टफोलिओ इलेक्ट्रिक दुचाकी व चारचाकींपर्यंत वाढवण्‍याची देखील योजना आहे.
कंपनी आता त्‍यांच्‍या सेवा ई-कॉमर्स कंपन्‍या, किराणा, पोल्‍ट्री, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, औषधे, एफएमसीजी उत्‍पादने,
गॅस सिलिंडर्स, मोबाइल टी स्‍टॉल्‍स किंवा भोजनालये, स्‍थानिक बाजारपेठांमधील माल वाहतूकीच्‍या मोठ्या व लघु वितरकांना देण्‍यास उत्‍सुक आहे.
सेवा सुरू राहण्‍याच्‍या खात्रीसाठी विद्युतमध्‍ये अल्‍टीग्रीन येथे प्रशिक्षण घेतलेली अंतर्गत टेक्निकल टीम देखील असेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

”आमच्‍या ईव्‍ही सोल्‍यूशन्‍सना दिल्‍ली, मुंबई, कोलकाता व चेन्‍नई बाजारपेठांमध्‍ये उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
या सहयोगामुळे आम्‍हाला पश्चिममेमध्‍ये अनेक संधी मिळतील आणि राष्‍ट्रीय स्‍तरावरील आमची उपस्थिती अधिक प्रबळ होईल.
प्रमुख ई-कॉमर्स व एफएमसीजी कंपन्‍यांच्‍या वाढत्‍या लोकप्रि‍यतेमुळे भारतभरात ३ पीएल ऑपरेटर्ससह कार्गो कार्यसंचालनांमध्‍ये ईव्‍हींचा अवलंब झपाट्याने वाढत आहे.
ई-कॉमर्स, फळे, पालेभाज्‍या, औषधे, व्‍हाइट गूड्स डिस्ट्रिब्‍युशन, रिटेल असे उच्‍च आकारमान,
कमी दर्जा असलेले विभाग उदयास येत असल्‍यामुळे आंतरशहरी व्‍यावसायिक परिवहनामध्‍ये तीनचाकी व चारचाकी विभागांमधील डिझेल पर्यायांऐवजी शुद्ध, कार्यक्षम, विश्‍वसनीय व कमी खर्चिक ईव्‍हींसाठी मागणी वाढत आहे,” असे अल्‍टीग्रीन चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अमिताभ सरन (Altigreen’s Chief Executive Officer Amitabh Saran) म्‍हणाले.

 

Web Title: Pune News | Launch of Last-Mile Delivery Services with Altigreen by Electric Transport in Pune

 

हे देखील वाचा :

Isha Ambani | ईशा अंबानी यांची ‘स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट’च्या बोर्डावर नियुक्ती

Aryan Khan Drugs Case | अखेर ‘मन्नत’ पूर्ण ! मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यन खानचा जामीन मंजूर

Buldhana Crime | चक्क 10 रुपयांसाठी मित्रानेच मित्राची केली हत्या; बुलढाणा जिल्ह्यात खळबळ

 

Related Posts