IMPIMP

Pune News | नाट्यगृहांच्या स्वच्छतेत आयुक्तांनी लक्ष घालावे; माजी आमदार मोहन जोशी

by nagesh
Former MLA Mohan Joshi | After 5 years in office, Pune went to the pits; BJP delegation's visit is a mere stunt - Mohan Joshi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune News | कोरोना साथ नियंत्रणात आल्याने महापालिकेची (PMC) नाट्यगृहे खुली करण्यात् आली आहेत, अशावेळी नाट्यगृहातील स्वच्छता आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी या मुख्य गोष्टीकडे आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी मागणी माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी केली (Pune News) आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

गेली सुमारे दीड वर्ष बंद असलेली नाट्यगृहे खुली झाली याचा आनंद आहे. पण, कोरोना साथ पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. याकरिता नाट्यगृहांमधील स्वच्छता, सॅनिटायझेशन अशा गोष्टीं महत्वाच्या आहेत. साथीच्या नियंत्रणा पूर्वी नाट्यगृहांमध्ये स्वच्छता नसल्याने कलावंतांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वच्छता असावी, पिण्यासाठी शुद्ध पाणी नाट्यगृहात उपलब्ध व्हावे, ही प्रेक्षक आणि कलाकारांची मुख्य मागणी आहे. सद्यस्थिती लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांनीच त्यात लक्ष घालणे आवश्यक आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले (Pune News) आहे.

 

Web Title : Pune News | The Commissioner should pay attention to the cleanliness of the theaters; Former MLA Mohan Joshi

 

हे देखील वाचा :

RTO Registration Certificate | RTO चा नवा नियम ! वाहन खरेदीनंतर नोंदणीसाठी आरटीओमध्ये जाण्याचे हेलपाटे थांबणार

Earn Money | ‘या’ वनस्पतीची लागवड करून करा लाखोंची कमाई ! सरकार देखील देतंय अनुदान, जाणून घ्या

Dilip Walse Patil | ‘फडणवीसांनी विरोधक म्हणून भूमिका घेताना राज्याला कमीपणा येऊ नये, हे पाहावे’

 

Related Posts