IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime Branch | किशोर आवारे खुन प्रकरणाचा मुख्य सुत्रधार माजी नगरसेवक चंद्रभान खळदेला नाशिकमधून अटक

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime Branch | Former corporator Chandrabhan Khalde, the mastermind of the Kishor Aware murder case, was arrested from Nashik

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेतील गुंडा विरोधी पथकानं जनविकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर गंगाराम आवारे (Kishor Aware Murder Case) यांच्या खुन प्रकरणातील मुख्य सुत्रधार माजी नगरसेवक चंद्रभान विश्वनाथ खळदे (Chandrabhan Vishwanath Khalde) याला नाशिक (Nashik) येथून अटक केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासुन चंद्रभान खळदे हा फरार होता. (Pune Pimpri Chinchwad Crime Branch)

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 12 मे 2023 रोजी किशोर गंगाराम आवारे यांचा तळेगाव नगर परिषदेच्या कार्यालयाच्या आवारात शाम अरूण निगडीकर (Sham Arun Nigdikar), प्रविण उर्फ रघुनाथ संभाजी धोत्रे (Pravin alias Raghunath Sambhaji Dhotre), आदेश विठ्ठल धोत्रे Adesh Vitthal Dhotre (सर्व रा. तळेगाव दाभाडे) आणि संदीप उर्फ नन्या विठ्ठल मोरे Sandeep alias Nanya Vitthal More (रा. आकुर्डी, पुणे) यांनी गावठी पिस्तुलामधून गोळीबार केल्यानंतर धारदार हत्याराने सपासप वार करून खून केला होता. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) गुन्हा दाखल आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime Branch)

किशोर आवारे खून प्रकरणामध्ये गुन्ह्याचा कट रचला म्हणून गौरव चंद्रभान खळदे (रा. तळेगाव दाभाडे, पुणे) यास अटक करण्यात आली होती. गुन्हयाचा मास्टरमाईंड आरोपी चंद्रभान विश्वनाथ खळदे (63, रा. कडोळकर कॉलनी, ऋतुचंद्र, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) याचे नाव निष्पन्न झाले होते. तेव्हपासुन तो त्याचा मोबाईल वापरत नव्हता. मोबाईल बंद करून तो रहात असलेल्या ठिकाणाहुन निघुन गेला होता. सुमारे 2 महिन्यापासुन तो फरार होता. तो गेल्या 15 वर्षे नगरसेवक असल्याने त्याच्याबाबत कोणीही माहिती देत नसल्याने त्याचा पत्ता लागत नव्हता.

गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माने, पोलिस अंमलदार प्रविण तापकीर, सोपान ठोकळ आणि शुभम कदम हे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रभान खळदेचा शोध घेत होते. खळदे हा प्रथम खंडाळा नंतर यवत (ता. दौंड) आणि त्यानंतर हैदराबाद व नंतर नाशिक येथील सिंधी कॉलनीत वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. पोलिसांनी सापळा रचुन खळदेला अखेर अटक केली. (Pimpri Chinchwad Police Crime Branch)

सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinay Kumar Choubey),
सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे (IPS Dr. Sanjay Shinde), अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी (IPS Vasant Pardeshi),
गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुकत स्वप्ना गोरे (DCP Swapna Gore), सहाय्यक पोलिस आयुक्त सतिश माने (ACP Satish Mane)
यांच्या मार्गदर्शनाखाली गंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एच.व्ही. माने (API H.V. Mane),
पोलिस अंमलदार हजरत पठाण, प्रविण तापकिर, सोपान ठोकळ, गंगाराम चव्हाण, विक्रम जगदाळे,
गणेश मेदगे, विजय गंभीरे, सुनिल चौधरी, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, मयुर दळवी, रामदास मोहिते,
ज्ञानेश्वर गिरी, शुभम कदम, तौसीफ शेख तसेच टीएडब्ल्यूचे नागेश माळी व पोपट हुलगे यांच्या पथकाने केली आहे.

Web Title : Pune Pimpri Chinchwad Crime Branch | Former corporator Chandrabhan Khalde,
the mastermind of the Kishor Aware murder case, was arrested from Nashik

Related Posts