IMPIMP

MP Supriya Sule | ‘त्या’ प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंनी मानले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार, म्हणाल्या…

by nagesh
MP Supriya Sule | supriya sule thanks cm eknath shinde and dcm devendra fadnavis over shahu maharaj scholarship

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- परदेशात शिक्षण घेत असलेल्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी गुण मिळाल्याने ‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण
शिष्यवृत्तीचा’ (Rajarshi Shahu Maharaj Scholarship for Foreign Education) लाभ थांबवण्यात आला होता. याची माहिती मिळताच खासदार
सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी राज्य सरकारला (State Sovernment) ही शिष्यवृत्ती पुन्हा सुरु करण्याची मागणी केली होती. याला आता
राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना पुन्हा बहाल केली आहे. यावर सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी ट्विट
करत राज्य सरकारचे अभार मानले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

अनुसूचित जाती (Scheduled Caste) व नवबौद्ध समाजातील (Neo-Buddhist Society) विद्यार्थ्यांसाठी ‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती’ही योजना राबविण्यात येते. यामध्ये परदेशातील विद्यार्थ्यांची शिक्षण पूर्ण फी, आरोग्य विमा व व्हिसा शुल्क मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे.

 

 

परंतु अनेकदा नवे वातावरण व अन्य काही कारणांमुळे मुलांना एटीकेटी (ATKT) मिळते. यानंतर त्यांची शिष्यवृत्ती थांबवली जाते.या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन परदेशात शिकत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाल्याने त्यांची शिष्यवृत्ती थांबली होती. त्यामुळे त्यांना तेथे मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत राज्य शासनाकडे या मुलांची शिष्यवृत्ती पुर्ववत करण्यासाठी पाठपुरावा केला होता. याला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने ही शिष्यवृत्ती पुन्हा बहाल केली आहे. ही अतिशय आनंदाची बाब असून यामुळे सदर विद्यार्थ्यांचे शिक्षण आता पुन्हा व्यवस्थित होऊ शकेल असा विश्वास सुप्रिया सुळेंनी (MP Supriya Sule) व्यक्त केला आहे.

 

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे मनापासून आभार व सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!, असं सुप्रिया सुळेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MP Supriya Sule | supriya sule thanks cm eknath shinde and dcm devendra fadnavis over shahu maharaj scholarship

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – फोटो पतीला दाखविण्याची, मुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार

MP Sanjay Raut | त्यावरही भाजपच्या पोपटांनी बोलावं, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

CM Eknath Shinde | आरक्षणाचा मार्ग बंद झालेला नाही, गैरसमज करुन घेऊ नका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (व्हिडिओ)

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : खडकी पोलिस स्टेशन – बोपोडीत युवकाच्या खुनाचा प्रयत्न, चौघांविरूध्द गुन्हा

 

Related Posts