IMPIMP

Pune Pimpri Crime | भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाला टोळक्याकडून टॉमीने मारहाण

by nagesh
Pune Crime News | Pune-Warje Malwadi Crime News : Warje Police Station - Gangsters attempt to kill by stabbing them with swords due to prior enmity

चाकण : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Pimpri Crime | हॉटेल समोरील रस्त्यावर सुरु असणारी भांडणं (Quarrel) सोडवणं एका हॉटेल
व्यावसायिकाला (Hotelier) महागात पडलं आहे. भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करत असताना चार जणांच्या टोळक्याने व्यावसायिकाला टॉमीने
बेदम मारहाण (Beaten by Tommy) करत जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempted Murder) केला. हा प्रकार चाकण येथे शनिवारी (दि.27) रात्री सव्वा
अकराच्या सुमारास चक्रेश्वर रोडवर असणाऱ्या मैफिल हॉटेलच्या (Pune Pimpri Crime) समोर घडला.

 

याप्रकरणी मारुती रमेश थिगळे, विशाल लक्ष्मण चौधरी, योगेश काशीनाथ थिगळे (रा.खेड), माहि रुपेश शिंदे (रा. कांची इन्कलेव्ह सोसायटी, चाकण) यांच्यावर IPC 307, 326,324, 504, 506,34 अन्वये गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. याबाबत महारुद्र शिवबसप्पा शिरगावी Maharudra Shivbasappa Shirgavi (वय – 38 रा. चक्रेश्वर रोड, चाकण मुळ रा. हुक्केरी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव, कर्नाटक) यांनी चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी यांच्या हॉटेलसमोर हातात दारुच्या बाटल्या घेऊन भांडण करत होते.
यावेळी तेथून जात असताना फिर्यादी हे भांडण सोडवण्यासाठी गेले.
त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
तर मारुती थिगळे याने फिर्यादी यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात काचेची बाटली मारुन गंभीर जखमी (Seriously Injured) केले.
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने ईको गाडीतील लोखंडी टॉमीने फिर्यादी यांच्या हातावर, पायावर, तोंडावर व डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बामणे (PSI Bamane) करीत आहेत.

 

Web Title : –  Pune Pimpri Crime | A hotelier who intervened to resolve the dispute was beaten up by the gang

 

हे देखील वाचा :

Shyam Global Technoventures | श्याम ग्लोबल टेक्नोव्हेंचर्स प्रा. लि. (ओईएम, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड) द्वारे पुण्यात नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंनी घेतली ‘सागर’ बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट, चर्चांना उधाण

Pune Pimpri Crime | पिंपरीत ज्येष्ठ नागरिकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

 

Related Posts