IMPIMP

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंनी घेतली ‘सागर’ बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट, चर्चांना उधाण

by nagesh
MNS On Shinde-Fadnavis Government | ambarnath news kalyans next mp will not be without mnss help says mns mla raju patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात महापालिका निवडणुकांच्या (Municipal Elections) पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या संघटनेला मजबूत करण्याच्या कामाला लागला आहे. यातच शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती (Shivsena -Sambhaji Brigade Alliance) केली आहे. यानंतर आज मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची तासभर बंद दाराआड चर्चा झाली. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या दोन नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शस्त्रक्रियेनंतर विश्रांती घेणारे राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) पुन्हा एकदा सक्रीय झाले असून नुकतंच ते पुण्यात सभासद नोंदणीसाठी पोहोचले होते. यानंतर राज ठाकरे यांनी आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांची सागर या त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीबाबत दोन्ही नेत्यांनी गुप्तता ठेवली होती. या भेटीदरम्यान काय चर्चा झाली ? याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.

 

दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शिवतीर्थ वर जाऊन भेट घेतली होती.
राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिरात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.
या बैठकीत पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात केली.
त्यानंतर आता राज ठाकरेंनी सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

 

Web Title : –  MNS Chief Raj Thackeray | mns chief raj thackeray meets deputy chief minister devendra fadnavis inciting discussions in political circles

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | पिंपरीत ज्येष्ठ नागरिकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Pankaja Munde | भाजप पंख छाटतं, राष्ट्रवादीच्या नेत्याची पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर

Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टातील निर्णय व्हायला चार ते पाच वर्षे लागतील, शिंदे गटाच्या आमदाराचे सूचक विधान

CM Eknath Shinde | गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! गणेश भक्तांच्या वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मिळणार ‘ही’ खास सुविधा

Pune Crime | पतीला संबंधाबाबत सांगण्याची धमकी देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार, हडपसर परिसरातील घटना

 

Related Posts