IMPIMP

Pune Pimpri Crime | नवस फेडण्यासाठी दगडूशेठ गणपतीला चल असे म्हणत महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग

by nagesh
Pune Crime News | A case of molestation against a goon in Shivajinagar village; Obscene chale with a young woman on the street

पिंपरी :सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Crime | तुझ्यासाठी बुलेट घेतलीय, नवस फेडायला दगडूशेठ गणपतीला चल असे म्हणत गैरवर्तन
करून तरुणीचा विनयभंग केला. हा प्रकार पिंपरी येथील नव महाराष्ट्र शाळेजवळ मंगळवारी (दि.29) सकाळी पावणेबाराच्या सुमारास घडला आहे.
याप्रकरणी (Pune Pimpri Crime) पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत 17 वर्षांच्या पीडित तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आदित्य उर्फ सागर संजू जाधव (वय – 19, रा. पिंपरी) याच्यावर आयपीसी 354, 354 (ड), 506, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलीस उपनिरीक्षक अशोक कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही नव महाराष्ट्र शाळेत इयत्ता
11 वीमध्ये शिकते. आरोपी हा ती राहत असलेल्या परिसरात राहतो.
बुधवारी सकाळी तरुणी कॉलेजमध्ये आली असता, आरोपी बुलेट गाडीवरून त्या ठिकाणी आला. त्याने तरुणीचा हात पकडून म्हणाला, ‘मी दगडूशेठ गणपतीला नवस केला आहे, मी जेव्हा नवीन बुलेट घेईन त्यावेळी माझ्या गाडीवर प्रथम तुला बसवून घेऊन येईन’, त्यावेळी तरुणीने हात झटकून सुटका करून घेतली. तरुणीने आरोपीला पाठलाग करू नकोस, अन्यथा शिक्षकांना सांगेन असे सांगितले. त्यावेळी ‘मी कोणाला घाबरत नाही, तू माझ्यासोबत चल नाही तर पळवून घेऊन जाईन,’ अशी धमकी देऊन गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title: Pune Pimpri Crime | College girl molested by asking Dagdusheth to go to Ganesha to pay his vows

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | उदयनराजे भोसलेंच्या अनुपस्थितीवर थेट बोलण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाळले; म्हणाले…

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॅमेज कंट्रोल मोडवर?; प्रतापगडावर शिवप्रताप दिनानिमित्त म्हणाले – ‘जर राज्यात परिवर्तन झालं नसतं, तर…’

Pune Crime | गोळीबार झाल्याचा बनाव करुन व्यावसायिकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी; 80 लाख रुपये खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारावर गुन्हे शाखेकडून FIR

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल; म्हणाले – ‘मी विचारलेले प्रश्न…’

 

Related Posts