IMPIMP

Pune Pimpri Crime | सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग, वडिलांची बाजू घेणाऱ्या पतीसह सासऱ्यावर FIR

by nagesh
Rape

तळेगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Crime | पतीच्या विवाहबाह्य संबंधास (Extramarital Affair) विरोध केल्याने पती एका
महिलेला घेऊन वेगळा राहिला. याचा फायदा घेत सासऱ्याने (Father-in-Law) सुनेकडे (Daughter-in-Law) शरीर संबंधाची मागणी केली. याबाबत
पतीकडे तक्रार केली असता त्यानेही वडिलांची बाजू घेत महिलेला शिवीगाळ केली. पीडित महिलेने पोलिसांकडे (Pune Pimpri Crime) धाव घेत पती
आणि सासऱ्या विरुद्ध तक्रार केली. हा प्रकार 2018 ते 11 नोव्हेंबर 2022 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत 29 वर्षाच्या पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन 35 वर्षीय पती आणि 75 वर्षाच्या सासऱ्यावर आयपीसी 354, 354(अ), 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असून त्यांनी याला विरोध केला.
यावरुन पतीने पीडित महिलेला मारहाण, शिवीगाळ केली. त्यानंतर पती एका महिलेला घेऊन खेड येथे राहण्यास गेला.
त्यानंतर सासऱ्याने महिलेसोबत गैरवर्तन (Abuse) केले. तसेच पती आणि तुझ्या नावावर असलेले कर्ज फेडतो असे सांगून महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली.
यासंदर्भात महिलेने पतीकडे तक्रार केली असता पतीने चारित्र्यावर संशय घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक धापटे (PSI Dhapte) करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Daughter-in-law molested by father-in-law, FIR against father-in-law with husband who sided with father

 

हे देखील वाचा :

Jayant Patil | ‘राज्यातील सरकार साम-दाम-दंड-भेद वापरून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय’ – जयंत पाटील

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | उध्दव ठाकरेंनी उच्च न्यायालयात मांडली व्यथा, म्हणाले – ’30 वर्ष शिवसेना चालवली पण आज वडिलांचं नाव अन् पक्षाचं चिन्ह…’

Katrina Kaif Pregnant | कतरिना कैफ आहे प्रेग्नंट?, व्हायरल फोटोंमध्ये दिसत आहे बेबी बंप

 

Related Posts