IMPIMP

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | उध्दव ठाकरेंनी उच्च न्यायालयात मांडली व्यथा, म्हणाले – ’30 वर्ष शिवसेना चालवली पण आज वडिलांचं नाव अन् पक्षाचं चिन्ह…’

by nagesh
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | have run shiv sena for 30 years but today can not use my fathers name symbol uddhav thackeray to delhi hc calls eci order illegal

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शिवसेनेचा (Shivsena) नाव आणि अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठविले आहे. त्यासंदर्भात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena – Uddhav Balasaheb Thackeray) वतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज (दि.14) सुनावणी पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपली बाजू मांडली. (Uddhav Thackeray Vs Eknath Shinde)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

न्यायमूर्ती संजीव नरुला (Sanjiv Narula) यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयात शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा ठाकरेंनी केला. या निर्णयामुळे पक्षाची राजकीय कामे खोळंबली आहेत, असे देखील ठाकरेंनी आपली बाजू मांडताना सांगितले. या नवीन नावांचे आणि गोठविलेल्या नावाचे माझ्या अशिलांच्या पक्षावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा युक्तीवाद ठाकरेंच्या वकिलांनी यावेळी न्यायालयात केला. तसेच निवडणूक चिन्हे निर्देशानुसार आवश्यक परिणामांची पूर्तता केल्याशिवाय भारतीय निवडणूक आयोगाने हा निकाल दिल्याचे ठाकरेंच्या वकिलांना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

 

मी पक्षाचा अध्यक्ष आहे. गेली ३० वर्षे मी शिवसेना पक्ष चालवीत आहे. निवडणूक आयोगाने प्रथमदर्शनी जे दिसत आहे, त्याच्या आधारे निकाल दिला आहे. त्यामुळे निवडणूक चिन्ह गोठविता येणार नाही. मी माझ्या वडिलांनी दिलेले नाव आणि चिन्ह वापरु शकत नाही, अशा शब्दांमध्ये ठाकरेंची बाजू वकिलांनी मांडली. तसेच आयोगाने दिलेले निर्देश हे बेकायदेशीर असल्याचा दावा देखील ठाकरेंच्या वकिलांनी न्यायालयासमोर केला. (Uddhav Thackeray Vs Eknath Shinde)

 

ठाकरेंचा पक्षावरील दावा आणि अधिकार कायम असून निवडणूक आयोगाचा निकाल हंगामी आहे.
त्यामुळे सध्या जारी करण्यात आलेले आदेश हे तात्पुरत्या स्वरुपाचे आहेत. हे आदेश पोटनिवडणुकीसाठी होते.
निवडणूक आयोगाने या प्रकरणात जातीने लक्ष घालवे आणि ठाकरेंनी सादर केलेल्या पुराव्यांची दखल घ्यावी,
असे निर्देश आम्ही देऊ शकतो, असे न्यायमूर्ती नरुला यांनी सांगितले.
या प्रकरणाची पुढील सुनावनी मंगळवारी होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | have run shiv sena for 30 years but today can not use my fathers name symbol uddhav thackeray to delhi hc calls eci order illegal

 

हे देखील वाचा :

Pune Crime | जेवण न दिल्याने हॉटेल कामगारावर हल्ला, 3 सराईत गुन्हेगार गजाआड; वारजे परिसरातील घटना

Katrina Kaif Pregnant | कतरिना कैफ आहे प्रेग्नंट?, व्हायरल फोटोंमध्ये दिसत आहे बेबी बंप

Sharad Pawar | गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा धक्का

 

Related Posts