IMPIMP

Chitra Wagh On Sushma Andhare | ‘आमची नावे घेऊन सुषमा अंधारेंचे दुकान चालू आहे’ – चित्रा वाघ

by nagesh
Chitra Wagh On Sushma Andhare | bjp leader chitra wagh criticizes sushma andhare on her speech

नवी मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  –  Chitra Wagh On Sushma Andhare | शिवसेनेच्या ठाकरे गटाची सध्या महाप्रबोधन यात्रा सुरु आहे. या निमित्ताने उपनेत्या सुषमा अंधारे महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. तसेच त्या यावेळी शिंदे गट आणि भाजपचा आपल्या खुमासदार शैलीत समाचार घेत आहेत. त्यांच्या या टीकांना भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमची नक्कल करुन त्या टाळ्या आणि शिट्ट्या मिळवितात. आमची नावे घेऊन त्यांचे दुकान चालत असेल, तर त्यांना आमच्या शुभेच्छा, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. (Chitra Wagh On Sushma Andhare)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चित्रा वाघ नवी मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. आमची नक्कल करून अंधारे टाळ्या आणि शिट्ट्या मिळवितात. मात्र, मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने काय दिवे लावले, हे त्यांनी महाराष्ट्राला सांगावे. त्यांच्या प्रत्येक विधानावर बोललेच पाहिजे, असे काही नाही. त्या त्यांचे काम करत आहेत. आम्ही आमचे काम करत राहू. असे कितीही आडवे आले तरी आम्हाला फरक पडणार नाही. आम्हाला आमची कामे आहेत.

 

आमच्या सरकारमुळे लोकांना लाभ मिळत आहे, लोकांच्या खात्यात पैसे जात आहेत, हे कोणीही नाकारु शकत नाही.
केंद्र सरकार लोकांसाठी कित्येक योजना राबवित आहे. आता सर्वांना शेतकरी आठवला.
सगळे शेतकऱ्यांच्या बांधांवर पळत आहेत. सत्तेत असताना अडीच वर्षे झोपले होते. 140 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण तेव्हा सर्वजण झोपले होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी बांधांवर जाऊन मोठ्या वल्गना केल्या. पण प्रत्यक्षात काही केले नाही. आम्ही शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा तिप्पट नुकसान भरपाई दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Chitra Wagh On Sushma Andhare | bjp leader chitra wagh criticizes sushma andhare on her speech

 

हे देखील वाचा :

Chhagan Bhujbal | “सध्याच्या स्त्रियांचे, समाजाचे आणि शिक्षण व्यवस्थेचे आदर्श चुकलेत” -छगन भुजबळ

Eknath Khadse | ‘मग एवढे दिवस तुझी जबान चूप का राहिली?’ एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना एकेरी भाषेत सुनावलं

 

Related Posts