IMPIMP

Pune Pimpri Crime | भर चौकात महिलेसोबत गैरवर्तन करणारा रिक्षाचालक गजाआड, तळेगाव दाभाडे येथील घटना

by nagesh
Pune Pimpri Crime | Rickshaw driver arrested for abusing woman

तळेगाव दाभाडे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Crime | गाडीला धक्का लागल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेसोबत रिक्षाचालकाने (Rickshaw Driver) गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) तळेगाव-वडगाव रोडवर मराठा क्रांती चौकासमोर मंगळवारी (दि.10) सकाळी दहाच्या सुमारास घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत एका महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी रिक्षाचालक दिलीप महादु डोळस Dileep Mahadu Dolas (वय-59 रा. माळवाडी वराळे रस्ता, ता. मावळ) याच्यावर आयपीसी 354, 294, 509, 279, 336, मोटार वाहन कायद्यांतर्गत (Motor Vehicle Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दुचाकीवरून जात असताना शिवाजी चौकाच्या बाजूने आरोपी रिक्षा भरधाव वेगात घेऊन आला. त्यामुळे फिर्यादी यांच्या दुचाकीला रिक्षाची धडक बसली.
यामध्ये फिर्यादी यांच्या गाडीचे नुकसान झाले.
याबाबत विचारणा करण्यासाठी फिर्यादी गेल्या असता आरोपीने त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली.
तसेच त्यांच्या अंगावर धावून जात मनास लज्जा उपन्न होईल असे कृत्य केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Rickshaw driver arrested for abusing woman

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | यात्रेत गावगुंडांचा हवेत गोळीबार, 4 जणांना अटक; मावळमधील घटना

Kirit Somaiya | हसन मुश्रीफ यांच्यावर ED च्या छापेमारीबाबत बोलले किरीट सोमय्या; म्हणाले…

Nashik Police Car Accident | मुंबई-आग्रा महामार्गावर पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात, तीन पोलीस कर्मचारी जखमी

 

Related Posts