IMPIMP

Pune Pimpri Crime | धक्कादायक ! बनावट कागदपत्राद्वारे शिपायाने दिले कंत्राटी ग्रामसेवक भरतीचे आदेश, दापोडी उपनिबंधक कार्यालयातील प्रकार

by nagesh
Satara Crime | Army officials raided academy at Phaltan, seized bogus documents-certificates

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Pimpri Crime | दापोडी येथील उपनिबंधक कार्यालयातील (Deputy Registrar Office Dapodi)
शिपायाने बनावट कागदपत्रांच्या (Fake Document) आधारे ग्रामसेवक भरतीचा बनावट आदेश (Fake Gram Sevak Recruitment Order) जारी
केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिपायाने (Peon) कंत्राटी पद्धतीने ग्रामसेवक म्हणून नियुक्त केल्याचा बनावट आदेश व इतर
कागदपत्र देत एकाची ग्रामसेवक पदावर नियुक्ती केली. हा प्रकार (Pune Pimpri Crime) 1 एप्रिल 2021 ते 10 जानेवारी 2022 या कालावधीत
दापोडीतील उपनिबंधक सहकारी संस्था येथे घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी शिपाई शशांक बळवंत हाटे Shashank Balwant Hate (वय-41 रा. 72 रास्ता पेठ, इस्त्राईल चर्च समोर, पुणे) याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) आयपीसी 420, 465,468 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी संतोष तुकाराम शिंगाडे Santosh Tukaram Shingade (वय-41 रा. पिंपळे गुरव) यांनी सोमवारी (दि.12) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलीस उपनिरीक्षक राजू भास्कर (PSI Raju Bhaskar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शशांक हाटे हा दापोडी उपनिबंधक सहकारी संस्था येथे शिपाई म्हणून कार्यरत आहे. शशांक हाटे याने तत्कालीन प्रमुख उपनिबंधक ए.टी. साकोरे (Deputy Registrar A.T. Sokore) यांच्या बनावट सहीने (Forged Signature) नितीन रायकर (Nitin Raikar) यांना कंत्राटी ग्रामसेवक भरतीचा बनावट आदेश दिला. तसेच शिपाई पदाचा रुजू अहवाल व प्रमाणपत्र दिली. नितीन रायकर हे कागदपत्र घेऊन कार्यालयात आले असता ही कागदपत्र बनावट असल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. या प्रकरणाची खातरजमा करुन शिपाई शशांक हाटे याच्या विरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपीने बनावट कागदपत्रांच्या आधारे नियुक्तीचे आदेश देऊन सरकारची फसवणूक (Fraud) केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू भास्कर करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Shocking! Contractual Gram Sevak recruitment orders given by constable through fake documents, Dapodi sub registrar office type

 

हे देखील वाचा :

Pune Ring Road – Land Acquisition | रिंगरोडच्या भूसंपादनाला सुरूवात

Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौकातील जुना उड्डाणपूल पाडण्यासाठी ड्रिलिंगचे काम सुरू

Pune Minor Girl Rape Case | जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चाकण परिसरातील घटना

 

Related Posts