IMPIMP

Pune Pimpri Crime | जुन्या भांडणातून तरुणावर दगड आणि कोयत्याने वार, भोसरीमधील चक्रपाणी वसाहतीच्या मंडई समोरील घटना

by nagesh
Pune Crime News | Pune-Warje Malwadi Crime News : Warje Police Station - Gangsters attempt to kill by stabbing them with swords due to prior enmity

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Pimpri Crime | पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर दगड आणि कोयत्याने हल्ला (Attack) करुन गंभीर जखमी केले. ही घटना भोसरी येथील (Pune Pimpri Crime) चक्रपाणी वसाहत (Chakrapani Colony) येथील गणेश भाजी मंडई समोर रविवारी (दि.4) रात्री साडेसातच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पाच जणांना भोसरी पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अवी रवि साखरे (वय-19), मोसीन शेख (वय-25), निखील गायकवाड (वय-19), प्रथमेश गायकवाड (वय-21), हरज्योत इंद्रजीत (वय-20 सर्व रा. भोसरी) यांच्यावर आयपीसी 326, 506, 142 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. याबाबत जखमी किशोर दिलीप कसबे (वय-24 रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी फिर्यादी हे बिगारी कामगार आहेत.
आरोपी आणि फिर्यादी यांची पूर्वी भांडण झाले होते. रविवारी रात्री फिर्यादी हे घरी जात होते.
गणेश भाजी मंडई समोर आले असता आरोपींनी भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादी यांना हाताने, दगडाने मारहाण (Beating) करण्यास सुरुवात केली.

 

तर अवी साखरे याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यात वार केला. यामध्ये गंभीर जखमी
झालेल्या फिर्यादी यांनी सोमवारी (दि.5) भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली.
पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार (PSI Pawar) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Stones and coyote attack on youth due to old feud, incident in front of Mandi of Chakrapani Colony in Bhosari

 

हे देखील वाचा :

PM Kisan 12th Installment | पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट, ‘या’ 10 स्थितीत मिळणार नाही पैसा

Ganeshotsav 2022 | पुण्यातील मानाच्या गणपती विसर्जन संदर्भात दाखल केलेली याचिका हाय कोर्टाने फेटाळली

Seat Belt – Airbags | भारतात 10 पैकी 7 लोक करतात ही चूक, जाणून घ्या – सीट बेल्टचे एअरबॅगशी काय आहे कनेक्शन?

Parbhani MNS | धक्कादायक ! परभणीत मनसे शहराध्यक्षाचा सपासप वार करुन खून, शहरात खळबळ

 

Related Posts