IMPIMP

Parbhani MNS | धक्कादायक ! परभणीत मनसे शहराध्यक्षाचा सपासप वार करुन खून, शहरात खळबळ

by nagesh
Parbhani MNS | Shocking! In Parbhani MNS city president was stabbed to death, excitement in the city

परभणी : सरकारसत्ता ऑनलाइन Parbhani MNS | परभणीमध्ये मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील (MNS City President Sachin Patil) यांचा मध्यरात्री चाकून सपासप वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ (Parbhani MNS) उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Parbhani Police) घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध सुरु केला आहे. ही घटना मंगळवारी (दि.6) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सचिन पाटील (रा. शिवराम नगर, परभणी) हे सोमवारी मध्यरात्री शिवराम नगर भागातील मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्यांचा विजय जाधव (Vijay Jadhav) याच्यासोबत वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. विजय याने त्याच्याकडे असलेल्या चाकूने सचिन पाटील यांच्या गळ्यावर, मानेवर वार केले. यात गंभीर जखमी (Seriously Injured) झालेल्या सचिन यांना त्यांच्या भावाने आणि मित्रांनी रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. सचिन पाटील यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

 

 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक जयंत मीना (SP Jayant Meena), पोलीस उपअधीक्षक
अविनाश कुमार (Deputy Superintendent of Police Avinash Kumar) यांच्यासह पोलीस निरीक्षक
संदिपान शेळके (Police Inspector Sandipan Shelke)यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी
दाखल झाला. परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस आरेपी विजय जाधव याचा शोध घेत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सचिन पाटील हे परभणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष (Parbhani MNS) म्हणून कार्यरत होते.
मागील अनेक वर्षापासून ते मनसे विद्यार्थी सेवा व विविध संघटनेच्या माध्यमातून शहरात काम करत होते.

 

Web Title: Parbhani MNS | Shocking! In Parbhani MNS city president was stabbed to death, excitement in the city

 

हे देखील वाचा :

Investment Tips | जर तुमच्याकडे असतील 2-5 लाख रुपये, तर या ठिकाणी करा गुंतवणूक, FD पेक्षा चांगला मिळू शकतो रिटर्न

Pune Crime | दरोड्याच्या तयारीतील आंध्र प्रदेशातील टोळी जेरबंद

Pune Crime | नगरसेविकेला ब्लॅकमेल करुन मागितली २५ लाखांची खंडणी; आरटीआय कार्यकर्त्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

 

Related Posts