IMPIMP

PM Kisan 12th Installment | पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट, ‘या’ 10 स्थितीत मिळणार नाही पैसा

by nagesh
PM Kisan 12th Installment | people associated with pm kisan yojana will not get benefits in these 10 conditions know in detail PM Kisan 12th Installment

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan 12th Installment | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही भारत सरकारच्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे. या योजनेंतर्गत सरकार छोट्या आणि सिमांत शेतकर्‍यांना आर्थिक मदत करते. ही सरकारची अशी योजना आहे, ज्यामध्ये थेट शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे पाठवले जातात. प्रत्येक शेतकर्‍याच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये ट्रान्सफर केले जातात. सरकार हे पैसे 3 समान हप्त्यांमध्ये पाठवते, म्हणजेच केंद्र सरकार प्रत्येक हप्त्यात 2,000 हजार रुपये ट्रान्सफर करते. (PM Kisan 12th Installment)

 

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान जारी केला जातो. दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान जारी केला जातो. तर तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान येतो. शेवटचा 11 वा हप्ता 31 मे 2022 रोजी रिलीज झाला होता. तेव्हा केंद्रातील मोदी सरकारने देशातील 10 कोटी पात्र शेतकर्‍यांकडे 21 हजार कोटी रुपये वर्ग केले होते. आता 12 वा हप्ता सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान कधीही शेतकर्‍यांच्या खात्यावर पाठवला जाऊ शकतो. (PM Kisan 12th Installment)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वाढवली नाही e-KYC अपडेट तारीख

 

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. ई-केवायसीची अंतिम तारीख 31 जुलै ते 31 ऑगस्ट अशी वाढवण्यात आली होती, जेणेकरून लाभ घेणार्‍या सर्व शेतकर्‍यांनी या तारखेपर्यंत ई-केवायसीशी संबंधित आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. अशावेळी, जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्ही ई-केवायसी केले नसेल, तर हप्त्याचे पैसे अडकू शकतात. त्याच वेळी, ई-केवायसी अपडेट करण्याची अंतिम मुदत सरकारने वाढवलेली नाही.

 

 

अशा स्थिती मिळणार नाही पीएम किसानचा लाभ

 

– जर एखादा शेतकरी शेती करत असेल आणि ती शेती त्याच्या नावावर नसून त्याच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर असेल, तर त्याला वार्षिक 6,000 रुपयांचा लाभ मिळणार नाही. लाभ घेण्यासाठी ती जमीन शेतकर्‍याच्या नावावर असावी.

– जर एखादा शेतकरी दुसर्‍या शेतकर्‍याची जमीन भाड्याने घेऊन शेती करत असेल तर त्यालाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

– कोणीही संस्थात्मक जमीनधारक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

– जर एखादा शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील कोणी घटनात्मक पदावर असेल तर त्यालाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

– राज्य/केंद्र सरकार तसेच पीएसयू आणि सरकारी स्वायत्त संस्थांचे सेवारत किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी या योजनेच्या लाभांतर्गत समाविष्ट होत नाहीत.

– डॉक्टर, इंजिनीअर, सीए, आर्किटेक्ट आणि वकील यांसारख्या व्यावसायिकांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही, जरी ते शेती करत असतील तरी.

– 10,000 रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शन मिळवणार्‍या निवृत्त पेन्शनधारकांना हा लाभ मिळणार नाही.

– गेल्या मूल्यांकन वर्षात प्राप्तीकर भरणार्‍या व्यवसायकींना सुद्धा योजनेच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे.

– शेतकरी कुटुंबातील कोणीही महानगरपालिका, जिल्हा पंचायतीमध्ये असतील तरीही त्यांना वगळण्यात येईल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कसे तपासावे स्टेटस

स्टेटस तपासण्यासाठी सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर, होमपेजच्या उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नर पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करा. नवीन पेज उघडण्यासाठी नोंदणी क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक पर्याय निवडा. कॅप्चा कोड प्रविष्ट करा. पुढे, जनरेट ओटीपीवर क्लिक करा. यानंतर तुमचे स्टेटस कळेल. जर तुम्ही ई-केवायसी केले नसेल, तर सिस्टम तुम्हाला स्टेटसबाबत कोणतीही माहिती देणार नाही आणि तुम्हाला केवायसी अपडेट करण्यास सांगू शकते.

 

Web Title:  PM Kisan 12th Installment | people associated with pm kisan yojana will not get benefits in these 10 conditions know in detail PM Kisan 12th Installment

 

हे देखील वाचा :

Ganeshotsav 2022 | पुण्यातील मानाच्या गणपती विसर्जन संदर्भात दाखल केलेली याचिका हाय कोर्टाने फेटाळली

Parbhani MNS | धक्कादायक ! परभणीत मनसे शहराध्यक्षाचा सपासप वार करुन खून, शहरात खळबळ

Seat Belt – Airbags | भारतात 10 पैकी 7 लोक करतात ही चूक, जाणून घ्या – सीट बेल्टचे एअरबॅगशी काय आहे कनेक्शन?

 

Related Posts