IMPIMP

Pune PMC Electric Vehicle Charging Station | पुणे महानगरपालिकेच्या वाहनतळावर बसवले 4 ‘इलेक्ट्रिक वाहन चार्जर’

by nagesh
Pune PMC Electric Vehicle Charging Station | four electric vehicle chargers has been installed at the pune municipal corporation parking lot pune pmc news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune PMC Electric Vehicle Charging Station | एकिकडे पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) दराचा भडका उडाला आहे. याचा फटका अनेकांना होत आहे. हा परिणाम पाहता अनेकजण इलेक्ट्रिक वाहनाला (Electric Vehicle) प्राधान्य देताना दिसत आहे. अशातच पुणे शहरातील अनेकांनी इलेक्ट्रिक वाहन (EV Bike) खरेदी केले आहे. त्यामुळे या इलेक्ट्रिक वाहनांंसाठी चार्जिंग स्टेशनची सोय फार ठिकाणी उपलब्ध नव्हती. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन धारकांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेता पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) वाहनतळावर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन (Pune PMC Electric Vehicle Charging Station) बसवले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

महानगरपालिकेने ट्विट करत माहिती दिली आहे की, ‘महानगरपालिकेच्या वाहनतळामध्ये चार इलेक्ट्रिक वाहन चार्जर बसविण्यात आले आहेत. सहज चार्जिंग सुविधेमुळे अधिकारी-कर्मचारी आणि अभ्यागतांना इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. असेच आणखी चार्जिंग स्टेशन महापालिकेसह इतर शासकीय कार्यालयात बसविण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.

 

 

इलेक्ट्रिक वाहन अनेकांनी खरेदी केले मात्र त्याच्या चार्जिंगचा प्रश्न निर्माण होत आहे. अनेकदा तासानुसार अथवा किलोमीटर नुसार हे इलेक्ट्रिक वाहन काम करतात. त्यात मध्येच चार्जिंग संपलं तर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर पुण्यासह इतर लहान शहरात देखील या इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक शहरात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची सोय करण्याची आवश्यकता आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, पुणे शहरातील 70 टक्के नागरीक वैयक्तिक दुचाकींचा वापर करतात.
यामुळे शहरात वाहतूक कोंडी होतेच मात्र त्याचबरोबर प्रदुषणाचं प्रमाण देखील वाढत आहे.
त्यामुळे अनेकदा शासनाकडून इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पेट्रोलच्या किमतीने उच्चांक गाठला आहे. त्याला पर्याय म्हणून सध्या इलेक्ट्रिक वाहनांना अनेकजण प्राधान्य देत आहेत.

 

Web Title :- Pune PMC Electric Vehicle Charging Station | four electric vehicle chargers has been installed at the pune municipal corporation parking lot pune pmc news

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | नोकरीच्या शोधात असलेल्याची पिंपरीत चिठ्ठी लिहून आत्महत्या, चिठ्ठीत म्हटले…

What Married Woman Search On Google | विवाहित महिला नेमकं Google वर काय सर्च करतात ?; पाहा व्हाल आश्चर्यचकीत

Maharashtra Rains | अखेर प्रतीक्षा संपली ! राज्यात सर्वत्र पावसाचं वातावरण, पुणे शहरात सर्वत्र ‘धो-धो’

 

Related Posts