IMPIMP

Pune PMC News | पुण्यात अतिक्रमण विरोधी कारवाई करताना सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण

by nagesh
Pune PMC News | street vendors attacked guards of municipal corporation in pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन– Pune PMC News | पुण्यामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई (Anti-Encroachment Action) जोरदार सुरू आहे.
या कारवाईमध्ये आज पालिकेच्या सुरक्षारक्षकावर हल्ला करण्यात आला आहे. कारवाई चालू असताना फेरीवाल्यांकडून पालिकेच्या सुरक्षारक्षकालाच
बेदम मारहाण करण्यात आली आहे. (Pune PMC News)

 

पुण्यातील ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या (PMC Dhole Patil Regional Office) अंतर्गत अतिक्रमण कारवाई सुरु असताना सुरक्षारक्षकाला मारहाण झाली. अनाधिकृत फेरीवाल्यांविरोधात (Unauthorized Hawkers) कारवाई केली जात असताना त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यावर हात उचलला. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी अनाधिकृत फेरीवाली असलेल्या दोघा-तिघांनी त्याला पकडून बुक्क्या मारत होते. तसेच एकाने तर हातातील पातीलेही कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातले. अतिक्रमण निरीक्षकांच्या नेतृत्वात अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात ही कारवाई केली जात होती तरी मात्र सुरक्षारक्षकाला मारहाण करण्यात आली आहे.

 

दरम्यान या प्रकरणाविरोधात अतिक्रमण विभाग (Encroachment Department) उद्या बंद पाळणार आहे.
तसेच पालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांची भेट घेत संपूर्ण हकीकत सांगणार आहेत.
अतिक्रमण विरोधी कारवाई करताना कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण दिलं जात नसून, हा मुद्दा ते आयुक्तांसमोर मांडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सुरक्षारक्षक आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी या मारहाणी विरोधात पोलीस तक्रार करणार आहेत. (Pune PMC News)

 

 

Web Title :  Pune PMC News | street vendors attacked guards of municipal corporation in pune

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | नळस्टॉप चौकातील ‘नाईट लाईफ’ अतिक्रमण विभागाकडून बंद; खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर मध्यरात्री केली कारवाई

Pune Crime News | वानवडी पोलिसांकडून मोबाईल चोरी करणार्‍या उच्चशिक्षीत तरूणास अटक

Aryan Khan Drugs Case | समीर वानखेडेंसह NCB च्या दोन अधिकाऱ्यांचे फोन जप्त, सीबीआय चौकशीची तारीख ठरली

Pune Crime News | विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत दहशत निर्माण करणार्‍या सराईत गुन्हेगारावर MPDA, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची आतापर्यंतची 15 वी कारवाई

 

Related Posts