IMPIMP

Pune PMC News | नियोजनाशिवाय उभारल्या जाणार्‍या व वापराशिवाय पडून राहाणार्‍या ‘वास्तु’ उभारणीस लागणार चाप

वापराचे प्रयोजन व भविष्यातील तरतुदींचे हमीपत्र घेतल्याशिवाय नवीन वास्तु न उभारण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय

by nagesh
Pune PMC News | Pune Municipality will impose a fine of Rs 1,000 on illegal flex, banner and hoardings, if the fine is not paid, the revenue will be taxed.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune PMC News | नगरसेवकांच्या विकासाच्या ‘संकल्पने’ नुसार करण्यात येणारी ‘बांधकामे’ वापराविना पडून राहत असल्याने महापालिका प्रशासनाने (Pune Municipal Corporation Administration) कडक भुमिका घेतली आहे (PMC Construction Department). महापालिकेच्या विविध विभागांनी मिळकत उभारण्याची मागणी करण्यासोबतच, वापराचे प्रयोजन, कर्मचार्‍यांची उपलब्धता आणि आर्थिक तरतूद याबाबत ना हरकत पत्र बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे (PMC Administration). प्रशासक राजवटीतच याची अंमलबजावणी सुरू केली जाणार असून नगरसेवकांचा (PMC Corporators) आग्रह आणि त्यांच्या दबावाला बळी पडून मिळकती उभारण्याचा प्रस्ताव रेटणार्‍या अधिकार्‍यांच्या मनमानीला यामुळे चांगलाच चाप बसणार आहे. (Pune PMC News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

महापालिकेच्या वतीने नागरी सुविधांसाठी समाज मंदिरे, व्यायामशाळा, बहुद्देशीय भवन, अभ्यासिका, विरंगुळा केंद्र, योगा केंद्र, हॉस्पीटल्स, शाळांच्या इमारती व वर्गखोल्या, क्रिडा संकुले, भाजी मंडई, जलतरण तलाव आदींची उभारणी करण्यात येते. बहुतांश वेळा नगरसेवकच त्यांच्या प्रभागांमध्ये महापालिकेच्या निधीतून यासाठीच्या वास्तु उभारण्यासाठी आग्रही असतात. यासाठी अगदी ५० लाखांपासून काही कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्यात येतो. यापैकी अनेक वास्तुंना स्वत:च्याच कुटुंबातील व्यक्तींची नावे देतात. महापालिकेच्या खर्चातूनच या वास्तुंचे थाटात मोठ्या व्यक्तींच्या हस्ते उदघाटनही केले जाते. मात्र, यापैकी अनेक वास्तु या वापराविना धूळखात पडून राहतात. वापराविनाच त्यावर वीज बील, मेन्टेनन्स, सुरक्षा असा लाखो रुपयांची उधळपट्टी होते. अनेकदा तर नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्तेच परस्पर या वास्तुंचा वापर करून बस्तान बसवत असल्याचीही प्रकरणे सातत्याने समोर येउ लागली आहेत. याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. (Pune PMC News)

 

यापैकी अनेक वास्तु या नगरसेवकांच्या स यादीतून भवन रचना विभागाच्या माध्यमातून उभारण्यात येतात. काम पूर्ण झाल्यानंतर त्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे वर्ग केल्या जातात. मालमत्ता व्यवस्थापन विभाग वापरानुसार संबधित विभागांकडे वास्तू हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया राबवितो. परंतू अनेक वास्तु संबधित विभाग संबधित वास्तुची गरजच नसल्याचे सांगत असल्याने या वास्तू वापराविनाच पडून राहत असल्याचे अथवा बेकायदेशीररित्या वापरात असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत.

 

या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने अशा वास्तु उभारण्यापुर्वीच त्याची संबधित विभागाकडून मागणी आहे का ?,
मागणी असेल तर वापराचे प्रयोजन काय ?, उभारणी आणि भविष्यातील मेन्टेनन्स, सुरक्षा व्यवस्था, कर्मचारी उपलब्धता आणि आर्थिक तरतूद आहे ? याचा सुस्पष्ट अभिप्राय अर्थात हमीपत्र संबधित विभागाकडून मिळाल्याशिवाय पुढील कार्यवाही करू नये, असे आदेश सर्व विभागांना देण्यात येणार आहेत.
यापुढील काळात ही कार्यपद्धती अवलंबून अनावश्यक वास्तुंची उभारणी रोखून उधळपट्टी रोखण्यात येईल,
अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune PMC News | The pressure will be on the erection of building which will be erected without planning and which will remain unused

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar On Neelam Gorhe | ‘निलमताई, तुमच्यासाठी थांबलो होतो, पण परबांनी ऐकलं नाही; तुम्ही शिवसेनावाल्यांनी आपापलं बघून घ्यावं’ – अजित पवार

Rules Change From 1st June | 1 जूनपासून बँकिंग, विमा, एलपीजीच्या दरासह ‘या’ 11 मोठ्या बदलांचा तुमच्या खिशावर होणार परिणाम; जाणून घ्या

Pune Crime | शारिरीक संबंधाचा व्हिडिओ काढून ‘गे’ असल्याची बदनामी करण्याची धमकी; 24 वर्षाच्या तरुणाकडून उकळली खंडणी

 

Related Posts