IMPIMP

Pune PMC Water Supply Department | फुरसुंगी आणि उरूळी देवाची गावातील पाणीप्रश्‍न जून अखेर संपणार

by nagesh
 Pune PMC News | Only 1 thousand 734 acacia, subabhali trees will be removed in the river bank improvement plan

पुणे – सरकारसत्ता ऑनलाइन – Pune PMC Water Supply Department | फुरसुंगी (Fursungi) आणि उरूळी देवाची (Uruli Devachi) या
गावांमधील महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या (Maharashtra Jeevan Pradhikaran) योजनेचे काम येत्या जून अखेरपर्यंत पुर्ण करून या भागाला पाणी
पुरवठा सुरू करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. या योजनेतून पाणी पुरवठा (Pune PMC Water Supply Department) सुरू झाल्यानंतर या
परिसरातील टँकरची संख्या मोठ्याप्रमाणात कमी होईल, अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध
पावसकर (PMC Water Supply Superintendent Aniruddha Pawaskar) यांनी दिली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्यावतीने फुरसुंगी आणि उरूळी देवाची या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना विकसित करण्याचे काम सुरू आहे. मात्र, ही गावे महापालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर जून २०२१ पासून या गावांतील योजनेसाठी निधी उपलब्ध झाला नाही. यामुळे या योेजनेचे काम संथ गतिने सुरू आहे. पुणे महापालिकेने (PMC) जानेवारीमध्ये या योजनेसाठी ३ कोटी रुपये उपलब्ध करून दिल्यानंतर संबधित ठेकेदाराची बिले अदा करण्यात आली आहेत. परंतू राज्य शासनाकडून (Maharashtra State Government) २४ कोटी रुपये निधी आल्यानंतरच या कामांना गती मिळणार आहे.

 

 

यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कडून शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. यापैकी १० कोटी २४ लाख रुपये निधी महापालिकेला द्यावा लागणार असून त्यानंतरच संपुर्ण योजनेचे काम पुर्ण होणार आहे. दरम्यान यापैकी साडेचार कोटी रुपये निधी तातडीने उपलब्ध झाल्यास जून २०२२ अखेर जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वीत करणे शक्य होणार आहे. जलशुद्धीकरण केंद्र कार्यन्वीत झाले तरी फुरसुंगी गावात अस्तित्वातील वितरण व्यवस्थेमार्फत बहुतांश भागात व उरूळी देवाची मधील ६० टक्के भागात पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. महापालिकेने ही रक्कम तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने महापालिकेकडे केली आहे. (Pune PMC Water Supply Department)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या या मागणीचा प्रशासनस्तरावर सकारात्मक विचार झाला असून ही रक्कम लवकरात लवकर देण्याची कार्यवाही करण्यात येईल. सध्या कचरा डेपोमुळे (Garbage Depot) बाधित फुरसुंगी व देवाची उरूळी परिसरात रोज २०० हून अधिक टँकरने पाणी पुरवठा करण्यात (Water Supply By Tanker) येत आहे. दरवर्षी यासाठी ७ ते ८ कोटी रुपये खर्च होतो. जीवन प्राधीकरणचे जलशुद्धीकरण केंद्र (Water Purification Center) सुरू झाले तरी टँकरची संख्या ३० ते ४० टँकरपर्यंत कमी होणार आहे. यामुळे नागरिकांना पाणी तर उपलब्ध होणारच असून टँकरवरील खर्चातही मोठ्याप्रमाणावर बचत होईल, असा दावा अनिरुद्ध पावसकर (Aniruddha Pawaskar) यांनी केला आहे.

 

 

Web Title :  Pune PMC Water Supply Department | The water crisis in Fursungi and Uruli Devachi villages will end by the end of June

 

हे देखील वाचा :

Pune Municipal Corporation (PMC) | 23 गावांत टँकरने पाणी पुरवठा करायचा झाल्यास 4500 टँकर्स लागणार ! महापालिका प्रशासनाचा प्राथमिक अंदाज

Chitra Wagh On Mumbai CP Sanjay Pandey | चित्रा वाघ यांचा मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सवाल; म्हणाल्या – ‘आपल्या खोटारड्या मालकांची पापं झाकण्यासाठी अजून किती…’

Pune Crime | विरोधी टोळीचे काम करत असल्याच्या कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार; जनता वसाहतीत पुन्हा दोन टोळ्यात राडा

 

Related Posts